Siddharth Shukla Passes away : अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली आणि सकाळी तो उठूच शकला नाही!
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. डॉक्टरांच्या मते सिद्धार्थ शुक्लाला हृदयविकाराचा झटका आला. (Siddharth Shukla Death: Actor Siddharth Shukla took some medicine before going to bed and could not get up in the morning!)
मुंबई : बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla) वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराने (Heart Attack) निधन झालं.चाहत्यांसाठी सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनं टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांना हादरवून सोडलं आहे.
झोपण्यापूर्वी घेतली काही औषधं
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लानं झोपण्यापूर्वी काही औषधं घेतली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाच नाही. डॉक्टरांच्या मते सिद्धार्थ शुक्लाला हृदयविकाराचा झटका आला आहे. काल रात्रीपर्यंत सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता. अशा परिस्थितीत, कोणताही आजार नसताना सिद्धार्थ शुक्लानं या जगाचा निरोप घेणं हे खूप धक्कादायक आहे.
सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर शहनाजने शूटिंग थांबवली
सिद्धार्थ शुक्लाची जवळची मैत्रीण शहनाज गिलनं त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर तिचं शूटिंग सोडलं आहे. शहनाज गिल सिद्धार्थच्या सर्वात जवळची होती. काही दिवसांपूर्वी दोघंही डान्स दिवानेमध्ये एकत्र रोमान्स करताना दिसले होते.
मनोरंजन विश्वात पदार्पण
सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.
सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.
तिथून परत आल्यानंतरही सिद्धार्थने मॉडेलिंग सुरू ठेवले. नंतर त्याने फेअरनेस क्रीमच्या व्यावसायिक जाहिरातीतही काम केले. या जाहिरातीनंतर त्यांना ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या टीव्ही शोमध्ये मुख्य भूमिका साकारली. मात्र, त्याला या मालिकेतून फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. यानंतर त्याला कलर्स टेलिव्हिजनचा शो ‘बालिका वधू’ मध्ये ‘शिव’ची भूमिका मिळाली. सिद्धार्थने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली.
सिद्धार्थची कारकीर्द
अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 सहभागींना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
संबंधित बातम्या