Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल दुःखात, वडिलांनी सांगितली कशी आहे मुलीची परिस्थिती

शहनाजचे वडील संतोख सिंह सुख यांनी सांगितलं की, त्यांच्या शहनाज ठीक नाहीये. ते लवकरच आपल्या मुलीजवळ मुंबईला जाणार आहेत. (Siddharth Shukla Death: Shahnaz Gill mourns after Siddharth Shukla's death, father tells how his daughter's condition is)

Siddharth Shukla Death : सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर शहनाज गिल दुःखात, वडिलांनी सांगितली कशी आहे मुलीची परिस्थिती
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 5:46 PM

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) आकस्मिक निधनानं सर्वांनाच धक्का बसला आहे. टीव्हीपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत, प्रत्येकजण शोक व्यक्त करत आहेत. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची खास मैत्रीण शहनाज गिल हादरून गेली आहे. शहनाज ठीक नसल्याचं कळलं आहे.

शहनाजचे वडील संतोख सिंह सुख यांनी सांगितलं की, त्यांच्या शहनाज ठीक नाहीये. ते लवकरच आपल्या मुलीजवळ मुंबईला जाणार आहेत.

शहबाज मुंबईत

शहनाज गिलचे वडील संतोख सिंग यांनी स्पॉटबॉयशी बोलताना सांगितलं आहे की शहनाज ठीक नाहीये. ते स्वतः सिद्धार्थबद्दल जाणून आश्चर्यचकित झाले आहेत. ते पुढे म्हणाले की मी सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही. हे कसं घडले यावर माझा विश्वास बसत नाहीये.

शहनाज शूटिंग करत होती

रिपोर्ट्सनुसार, शहनाजला जेव्हा सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळाली, त्यावेळी ती शूटिंग करत होती. तिला सिद्धार्थबद्दल कळताच ती शूटिंग सोडून तिथून निघून गेली.

नुकतंच दिसले बिग बॉस OTT मध्ये

नुकतंच सिद्धार्थ आणि शहनाज बिग बॉस ओटीटीमध्ये दिसले होते. जिथं त्यांनी स्पर्धकांसोबत खूप धमाल केली आणि शोचा होस्ट करण जोहरनंही सिद्धार्थला त्याच्या नात्याची स्थिती विचारली. तेव्हा सिद्धार्थनं सांगितलं होतं की हे दोघंही खूप चांगले मित्र आहेत.

याशिवाय दोघंही डान्स रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ मध्ये दिसले होते. जिथं चाहत्यांना दोघांना एकत्र डान्स करताना पाहून खूप आनंद झाला होता. डान्स दिवाने 3 मध्ये सिद्धार्थ आणि शहनाज यांनी स्पर्धक आणि जजसोबत खूप मजा केली, ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

वर्ष 2019 मध्ये, जेव्हा शहनाज आणि सिद्धार्थ रिअॅलिटी शो बिग बॉस 13 चा भाग बनले तेव्हा दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. ट्विटरवर नेहमीच एक ट्रेंड होता – सिडनाझ. आता सिडनाझची ही जोडी तुटली आहे. बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये आपण सिद्धार्थ आणि शहनाज एकमेकांशी भांडतानाही पाहिले, तर दुसरीकडे दोघंही एकमेकांची काळजी घेताना दिसले. दोघंही एकमेकांसोबत खूप सुंदर बॉन्ड शेअर करायचे.एकदा सिद्धार्थने शहनाजबद्दल एका मुलाखतीत सांगितलं होतं की, शहनाज एक हसणारी व्यक्ती आहे, ती कोणाच्याही जवळ असते तेव्हा ती सकारात्मकता पसरवते. आता या प्रिय मित्राच्या जाण्यानं शहनाज पूर्णपणे खचली आहे.

मनोरंजन विश्वात पदार्पण

सिद्धार्थ मुळचा मुंबईचाच होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयात कधीच रस नव्हता. सिद्धार्थला नेहमीच बिझनेस करायचा होता. मात्र, त्याच्या लुक्समुळे लोक त्याचे खूप कौतुक करायचे. 2004 मध्ये एकदा, आईच्या सांगण्यावरून, सिद्धार्थने मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला. पोर्टफोलिओ न घेता सिद्धार्थ तिथे पोहोचला होता. ज्युरीने सिद्धार्थचे लूक पाहून त्याची निवड केली होती. इथूनच त्याच्या प्रवासाची सुरुवात झाली होती.

सिद्धार्थने आईच्या सांगण्यावरून अनिच्छेने या स्पर्धेत भाग घेतला होता. पण, त्याला माहित नव्हते की यामुळे त्याचे नशीब बदलेल. सिद्धार्थने ही स्पर्धा जिंकली. यानंतर सिद्धार्थला 2008 मध्ये तुर्कीमध्ये होणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग शोमध्ये पाठवण्यात आले. तिथेही सिद्धार्थने जिंकून देशाचे नाव उंचावले.

संबंधित बातम्या

Siddharth Shukla dies | आधी ‘आनंदी’ गेली, आता ‘शिव’ही गेला, ‘बालिका वधू’च्या लाडक्या जोडीची अकाली एक्झिट

Sidharth Shukla dies : अभिनयात रस नव्हता, मॉडेलिंगही करायचे नव्हते, मग सिद्धार्थ शुक्ला मनोरंजन विश्वात आला कसा?

Sidharth Shukla Passes Away | आलिशान गाडी, मुंबईत फ्लॅट, कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक होता सिद्धार्थ शुक्ला, जाणून घ्या एकूण मालमत्ता

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.