आमच्यासाठी तो कायम मॉन्टीच होता, मनसे नेत्याने जागवल्या सिद्धार्थसोबतच्या बालपणीच्या आठवणी

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचे बालपणीचे मित्रं आणि मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनाही हा धक्का अनपेक्षित होता. (Sidharth Shukla)

आमच्यासाठी तो कायम मॉन्टीच होता, मनसे नेत्याने जागवल्या सिद्धार्थसोबतच्या बालपणीच्या आठवणी
Sidharth Shukla
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 11:18 AM

मुंबई: अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिद्धार्थचे बालपणीचे मित्रं आणि मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनाही हा धक्का अनपेक्षित होता. सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर कीर्तीकुमार यांनी त्याच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सिद्धार्थ आमच्यासाठी कायम मॉन्टीच होता. आम्ही त्याल मॉन्टी किंवा मोन्टू म्हणायचो. तो प्रकाशझोतात आल्यानंतर त्याचं नाव सिद्धार्थ असल्याचं समजलं. तोपर्यंत तो आमच्यासाठी मॉन्टीच होता, असं कीर्तीकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. (Sidharth Shukla: kirti kumar shinde Remember childhood friend, Says ‘he was our monty’)

कीर्तीकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टमधून सिद्धार्थ शुक्लाचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या खोडकर आणि दिलखुलास स्वभावावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मॉडेलिंग करण्यापूर्वीचा आणि नंतरचा सिद्धार्थ यावरही कीर्तीकुमार यांनी भाष्य केलं आहे.

कीर्तीकुमार यांची पोस्ट जशीच्या तशी

सिद्धार्थ शुक्ला हा माझा बालपणीचा मित्र. त्याचं नाव सिद्धार्थ आहे, हे मला तो ‘फेमस’ झाल्यावर कळलं. आमच्यासाठी तो ‘मॉन्टी’ (मोन्टू) होता. मुंबई सेंट्रलला ज्या कॉलनीत मी लहानाचा मोठा झालो, तिथेच मॉन्टी राहायचा. बाजूच्या बिल्डिंगमध्ये. शाळेच्या दिवसांतच मॉन्टी सहा फुटांपेक्षा उंच झाला. ‘देखणा’ काडी पैलवान. एकदम शिडशिडीत. पण एक नंबरचा भांडकुदळ. प्रत्येकाशी भांडण उकरून काढणं, ‘उंगल्या’ करणं हा त्याचा एकमेव छंद. स्वभावच म्हणा ना.

मॉन्टी माझ्यापेक्षा एक-दोन वर्षाने लहान. आम्ही पिकनिकला गेलो तरी कुणाचीतरी खोड काढल्याशिवाय त्याला स्वस्थ वाटायचं नाही. पण पुढे मॉडेलिंग आणि नंतर अभिनयाच्या क्षेत्रात गेल्यावर तो शांत झाला. एकदम परिपक्व व्यक्तिमत्व. उंची होतीच, पण व्यायामाने त्याने शरीर कमावलं. त्याला जाहिराती मिळू लागल्या. ‘बिग बॉस’ विजेता ठरला, तेव्हा तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. ‘बॉम्बे टाइम्स’ पुरवणीत तो ‘हॉट’ असल्याच्या बातम्या-लेख रोज येऊ लागले. एक मित्र म्हणून मला गंमत वाटायची… ‘सिद्धार्थ शुक्लाचे निधन’ अशा बातम्या धडकल्या आणि बालपणीच्या या आठवणी जाग्या झाल्या. खोडकर मित्रा मॉन्टी, तुझ्या चाहत्यांना हा धक्का पचणारा नाही.

आज अंत्यसंस्कार

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आज (शुक्रवार) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल (गुरुवारी) हृदयविकाराच्या धक्क्याने सिद्धार्थचे निधन झाले होते. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल डॉक्टरांनी पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सिद्धार्थचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून ब्रह्मा कुमारी जुहू कार्यालयात नेण्यात येईल, तिथे पूजा केल्यानंतर त्याचे पार्थिव ओशिवारा भागातील घरी आणले जाईल. सिद्धार्थ शुक्लाच्या घराबाहेर पोलीस तसेच खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर पोस्टर लावून श्रद्धांजली वाहिली आहे. शोकाकुल चाहत्यांनी साश्रू नयनांनी त्याच्या घराबाहेर गर्दी केली होती. आज दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Sidharth Shukla: kirti kumar shinde Remember childhood friend, Says ‘he was our monty’)

संबंधित बातम्या:

Sidharth Shukla Funeral Live Updates : सिद्धार्थ शुक्लाच्या शवविच्छेदन अहवालावर डॉक्टरांमध्ये मतभेद, अंतिम निष्कर्ष नाही

झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?

शहनाजला करायचं होतं सिद्धार्थ शुक्लाशी लग्न, बिग बॉस 13च्या ‘या’ माजी स्पर्धकानं केला खुलासा

(Sidharth Shukla: kirti kumar shinde Remember childhood friend, Says ‘he was our monty’)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.