झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?

डॉक्टरांनी अहवालात हार्ट अटॅकमुळे अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली असताना, आणखी एक गोष्ट समोर आली आहे. या माहितीनुसार, काल रात्री सिद्धार्थ शुक्ला ज्या गाडीने फ्लॅटवर पोहोचला, त्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटलेली होती.

झोपण्यापूर्वी गोळ्या घेतल्या, गाडीची काचही फुटलेली, आदल्या रात्री सिद्धार्थ शुक्लासोबत काय काय घडलं?
सिद्धार्थ शुक्ला
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 3:30 PM

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्ला याचे गुरुवारी (2 सप्टेंबर) सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थला मुंबईतील कूपर रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे डॉक्टरांनी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली.

सांगितले जात आहे की, सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध सेवन केली होती, त्यानंतर तो सकाळी उठलाचा नाही. डॉक्टरांनी अहवालात हार्ट अटॅकमुळे अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी केली असताना, आणखी एक गोष्ट समोर आली आहे. या माहितीनुसार, काल रात्री सिद्धार्थ शुक्ला ज्या गाडीने फ्लॅटवर पोहोचला, त्या बीएमडब्ल्यू कारची मागील काच फुटलेली होती.

उपस्थित होतायत शंका!

गाडीची ती अवस्था बघून, अशी अटकळ बांधली जात आहे की, सिद्धार्थचे काल रात्री कोणाशी भांडण तर झाले नाही ना? शेवटी, असे काय घडले ज्यामुळे कारची मागील काच तुटली? त्याने कोणाशी भांडण केले होते का, ज्यामुळे त्याला त्रास झाला होता?

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत

तर पोलीस सूत्रांनुसार, सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबियांनी कोणतीही शंका व्यक्त केली नाही. डॉ. निरंजन यांनी सिद्धार्थचा तपास केला आणि येथे येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. सध्या सिद्धार्थ शुक्लाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी देखील आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मनोरंजन विश्वावर शोककळा

असेही म्हटले जात आहे की, सिद्धार्थ शुक्ला त्याच्या फ्लॅटवर गेला होता आणि तिथे गेल्यानंतर त्याने झोपेच्या आधी काही औषध घेतले. जेव्हा तो सकाळी उठला नाही, तेव्हा त्याला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि तेथील डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. सेलेब्सपासून ते चाहत्यांपर्यंत, सगळेच अश्रू ढाळत आहेत. सिद्धार्थ शुक्लाची बहीण आणि मेहुणाही रुग्णालयात पोहोचले आहेत. 40 वर्षीय सर्वात चांगला मित्र सिद्धार्थ शुक्ला हा तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होता आणि त्याच्या आईच्या खूप जवळचा होता. त्याच्या आईच्या हट्टामुळेच त्याने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि नंतर अभिनय विश्वात पाऊल टाकले.

सिद्धार्थची कारकीर्द

अभिनेता, होस्ट आणि मॉडेल आहे जो हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटांमध्ये प्रामुख्यानं काम करत होता. तो ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिकांसाठी ओळखला जातो. तो बिग बॉस 13 आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 7 च्या रिअॅलिटी शोचा विजेता आहे. त्यानं सावधान इंडिया  आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले आहेत. त्याने डिसेंबर 2005 मध्ये आशिया, लॅटिन अमेरिका आणि युरोपमधील इतर 40 स्पर्धकांना हरवून जगातील सर्वोत्कृष्ट मॉडेलचं विजेतेपद पटकावले. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

हेही वाचा :

Sidharth Shukla dies : ‘SidNaaz’ची जोडी तुटली, सिद्धार्थच्या जाण्याने कोलमडली शहनाज गिल

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन, सोशल मीडिया शोकाकुल, चाहते म्हणाले विश्वास बसत नाही

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.