Tunisha Sharma Suicide Case | शीजान खान याच्या बहिणीने राग व्यक्त करत म्हटले की, यालाच कलियुग म्हणतात…
शीजान खान हा तुनिशा शर्मा हिला बुरखा घालण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप केला.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तुनिशा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेतला. अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये तुनिशा शर्मासोबत शीजान खान हा देखील मुख्य भूमिकेत होता. शीजान आणि तुनिशा हे दोघे रिलेशनशिपमध्ये देखील होते. मात्र, तुनिशाने आत्महत्या करण्याच्या 15 दिवस अगोदरच शीजान खान आणि तुनिशाचे ब्रेकअप झाले होते. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले.
शीजान खान हा तुनिशा शर्मा हिला बुरखा घालण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तुनिशा हिच्या मामाने तर हे सर्व प्रकरण लव्ह जिहादचे असल्याचे थेट सांगून टाकले. या प्रकरणात दररोज अनेक खुलासे होताना दिसत आहेत.
शीजान खान याच्यावर सतत गंभीर आरोप करण्यात येत असतानाच काल शीजानच्या वकिलाने हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून टाकले होते. शीजान खानवर होणाऱ्या आरोपावर आता थेट त्याच्या बहिणीने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.
View this post on Instagram
फलक नाज ही शीजान खान याची बहिण असून शीजान खान याच्या समर्थनार्थ ती आता मैदानामध्ये उतरली आहे. फलक हिने म्हटले की, हे सर्व बघून खूप त्रास होतोय. आम्ही शांत बसत असल्याने लोकांनी आम्हाला कमजोर समजले आहे.
बहुतेक लोक यालाच कलियुग बोलतात…शीजानच्या समर्थनामध्ये त्याची बहीण फलक नाज हिने मोठी पोस्ट शेअर केलीये. आता शीजानच्या बहिणीची हिच पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शीजान खान अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे देखील सांगितले जातंय. पोलिसांच्या हाती या प्रकरणातील महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागल्याची चर्चा आहे.