मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या करत सर्वांना मोठा धक्का दिला. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक आरोप करण्यात आले. अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेत तुनिशा शर्मा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान (Sheezan Khan) याला पोलिसांनी अटक केली. तुनिशाच्या आईने शीजान खान हाच माझ्या मुलीच्या आत्महेत्याला कारणीभूत असल्याचे म्हटले. तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदरच तुनिशा आणि शीजान खान यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळे ती तणावात होती असेही तुनिशाची आई म्हणाली. 21 डिसेंबर 2022 रोजी तुनिशाने आत्महत्या केली.
आता या प्रकरणात जवळपास तब्बल तीन महिन्यांनंतर शीजान खान याला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. भावाला कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर बहीण आणि अभिनेत्री फलक नाज हिने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. शीजान खान याला अटक केल्यानंतर फलक नाज ही सतत माध्यमांना बोलताना दिसली.
विशेष म्हणजे शीजान खान याची बहीण फलक नाज हिने देखील अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमध्ये काम केले आहे. तुनिशा शर्मा आणि फलक खूप चांगल्या मैत्रीणी होत्या. तुनिशाच्या वाढदिवसाच्या दिवशी फलक हिने एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यावेळी तिने तुनिशा शर्मा हिला मिस करत असल्याचे देखील म्हटले होते.
शीजान खान याला जामीन मिळाल्यानंतर फलक हिने इंस्टा स्टोरीवर लिहिले की, अल्हम्दुलिल्लाह…आज 4 मार्च 2023 रोजी शीजान खान याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्यानंतर शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा शर्मा हिने शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानेच आत्महत्या केली असा आरोप केला करण्यात आला.
तुनिशा शर्मा हिच्यासोबतच नाहीतर शीजान खान हा अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये तुनिशाने गळफास घेतला. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक खुलासे या प्रकरणात झाले. तुनिशाला शीजान खान याने कानाखाली मारली असल्याचाही आरोप तिच्या आईने केला आहे. आता या प्रकरणात तीन महिन्यानंतर शीजान खान याला दिलासा मिळाल्याने त्याच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.