Video | अब्दु रोजिक याच्या पार्टीमध्ये साैंदर्या शर्मा हिला बघताच नेटकऱ्यांचा चढला पारा
काही दिवसांपासून चर्चा आहे की, निम्रत काैर आणि शिव ठाकरे हे एक गाणे तयार करणार आहेत. बिग बाॅस 16 च्या सर्व स्पर्धकांसाठी एका पार्टीचे खास आयोजन काही दिवसांपूर्वी फराह खान हिने केले होते.
मुंबई : बिग बाॅस सीजन 16 चा फिनाले 12 फेब्रुवारी रोजी पार पडलाय. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बाॅस 16 चा विजेता झाला आहे. यंदाचे सीजन टीआरपीमध्ये टाॅपला राहिले. घरात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने दमदार कामगिरी करत प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केले. सुरूवातीला एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. प्रियंका चाैधरी हिच्या चाहत्यांनी तर बिग बाॅसवर काही गंभीर आरोपही केले. मुळात म्हणजे एमसी स्टॅन याची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बाहेर बघायला मिळते. बिग बाॅसच्या घरात एमसी स्टॅन हा फार जास्त टास्क वगैरे करताना कधीच दिसला नव्हता. मात्र, त्याचा फॅन बेस चांगला आहे. बिग बाॅसचा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन याने मोठा निर्णय घेत भारत टूर करण्याचा निर्णय घेतलाय. बिग बाॅसच्या घरात असताना दिलेल्या प्रेमाबद्दल एमसी स्टॅन याने सर्वांचे आभार मानले आहेत. बिग बाॅसच्या घरात शिव ठाकरे, एमसी स्टॅन, साजिद खान, अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांची खास मैत्री बघायला मिळाली.
काही दिवसांपासून चर्चा आहे की, निम्रत काैर आणि शिव ठाकरे हे एक गाणे तयार करणार आहेत. बिग बाॅस 16 च्या सर्व स्पर्धकांसाठी एका पार्टीचे खास आयोजन काही दिवसांपूर्वी फराह खान हिने केले होते. यामध्ये सर्वजण धमाल करताना दिसले होते.
नुकताच मुंबईमध्ये अब्दु रोजिक याने मंडळीसाठी आणि काही बिग बाॅस 16 च्या सदस्यांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला मंडळीचे सर्वच सदस्य उपस्थित होते. यावेळी अब्दु रोजिक हा शिव ठाकरे याच्यासोबत धमाल करताना दिसला. ज्याचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
View this post on Instagram
या पार्टीमध्ये साैंदर्या शर्मा हिने हजेरी लावली होती. यावेळी साैंदर्या शर्मा हिने अब्दु रोजिक याच्यासोबत खास रिल्स देखील तयार केले. मात्र, अनेकांना साैंदर्या शर्मा ही अब्दुच्या पार्टीमध्ये दिसल्याने राग आलाय. अनेकांनी यावेळी साैंदर्या शर्मा हिला खडेबोल सुनावले आहेत.
एका चाहत्याने कमेंट करत साैंदर्या शर्मा हिला खडेबोल सुनावले. त्याने लिहिले की, ही खूप जास्त नाटकी आहे. गाैतमचा हिने वापर केला आहे. दुसऱ्याने लिहिले की, 40 लाखांची अंगठी काकांकडून घेणारी ही साैंदर्या शर्मा आहे. अनेकांनी साैंदर्या शर्मा हिला नाटकी असल्याचे म्हटले.