Aai Kuthe Kay karte | अखेर अनिरुद्धपासून घटस्फोट घेऊन, ‘पत्नी’च्या भूमिकेतून मुक्त होऊन सुरु होणार अरुंधतीचा नवा प्रवास!

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे.

Aai Kuthe Kay karte | अखेर अनिरुद्धपासून घटस्फोट घेऊन, ‘पत्नी’च्या भूमिकेतून मुक्त होऊन सुरु होणार अरुंधतीचा नवा प्रवास!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 4:55 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, 25 वर्षातील संसाराच्या आठवणी मागे सोडून अरुंधती आता पुढील आयुष्यातील तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. ‘समृद्धी’ आठवणींची शिदोरी सोबत घेऊन आता आई पुन्हा एकदा तिच्या माहेरी निघाली आहे.

अरुंधतीला पाहून आई देखील दुःखी!

अनिरुद्धशी काडीमोड घेत, समृद्धीचा निरोप घेऊन अरुंधती आता आपल्या आईच्या घरी अर्थात माहेरी निघाली आहे. अरुंधती आता आपली आई आणि भाऊ यांच्यासोबत त्यांच्या डोंबिवलीच्या घरात राहणार आहे. आपल्या मुलीचा 25 वर्षांचा भरला संसार मोडताना पाहून अरुंधतीच्या आईला देखील दुःख झालं. आपल्या मुलीची ही अवस्था पाहून आई देखील पूर्णपणे कोलमडून गेली होती.

जेवणाच्या ताटावर अरुंधतीच्या आईने आपल्या मुलीच्या दुःखाने अश्रू ढाळले. नुकताच अम्लीकेचा नवा प्रोमो समोर आला असून, यात माय-लेकींमधील हा भावनिक बंध पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. या व्हिडीओत आई अरुंधतीला म्हणाली की, ’25 वर्षांचा संसार, पदरात 3 मुलं असताना कोण असं म्हणू शकतं की, माझं तुझ्यावर प्रेम नाही?’ यावर अरुंधती आईला म्हणते,’ आई असं भरल्या ताटावर रडू नये.’ आपल्याला जेवण जाणार नाही आता असे आई म्हणताच अरुंधती प्रेमाने आईला घास भरवते. मालिकेतील हे भावनिक दृश्य पहाताना सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणवतात.

पाहा नवा प्रोमो :

मालिकेत सध्या काय सुरु आहे?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या यशच्या साखरपुड्याचा सोहळा सुरु होता. या आनंदाच्या निमित्ताने घरातील सार्वजण एकत्र जमले होते. इतकेच नाही तर, 15 वर्षांपासून दूर असलेला अनिरुद्धचा भाऊ अविनाश देखील ‘समृद्धी’ बंगल्यात परतला आहे. घरात एकीकडे आनंदाचा सोहळा सुरु असताना मात्र, दुसरीकडे अनिरुद्धला वकिलांचा फोन येतो आणि घटस्फोटाची तारीख मिळाल्याचे सांगतो. एकीकडे उत्साह ओसंडून वाहत असताना, दुसरीकडे या वाईट बातमीने संपूर्ण देशमुख कुटुंब हादरून जात. मात्र, या वेळीही अरुंधती आपल्या निर्णयावर ठाम होती आणि अखेर तिने अनिरुद्धला घटस्फोट दिला.

(Star pravah Aai Kuthe Kay karte latest update Arundhati and aniruddh gets divorce)

हेही वाचा :

‘देवमाणूस’च्या अजित कुमारचं काम वाढलं म्हणून बज्याने आणला नवा असिस्टंट, पाहा कलाकारांचा धमाल व्हिडीओ

‘इंदिरा गांधीं’च्या भूमिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलंत का? नेटकरी करतायत मेकअप आर्टिस्टचं कौतुक!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.