Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुखाचे चांदणे, आई कुठं काय करते? मधलं अरुंधतीचं मच अवेटेड गाणं तुम्ही ऐकलात का? का ढसाढसा रडला अनिरुद्ध देशमुख?

'मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे... अंतरावर परसलेले टिपूरसे... सुखाचे चांदणे', असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील शब्द आणि अरुंधतीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय.

सुखाचे चांदणे, आई कुठं काय करते? मधलं अरुंधतीचं मच अवेटेड गाणं तुम्ही ऐकलात का? का ढसाढसा रडला अनिरुद्ध देशमुख?
मधुराणी प्रभुलकर- अरुंधती देशमुख
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 6:17 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनावर गारूड आहे. या मालिकेत काय चाललंय या विषयी घराघरात चर्चा होताना दिसते. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आहे. अनिरुद्धपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) म्हणजेच अरुंधती (Arundhati Deshmukh) आता स्वत:चा शोध घेण्यासाठी आता वेगळी वाट धरतेय. अरुंधती तिची आवड जोपासतेय. अरुंधतीला गाणं गाण्याची आवड आहे. तिची हीच आवड आता ती एका गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणतेय. अरुंधतीचं मच वेटेड गाणं आता रिलिज झालं आहे. अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे… अंतरावर परसलेले टिपूरसे… सुखाचे चांदणे’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील शब्द आणि अरुंधतीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. हे गाणं ऐकल्यानंतर अनिरुद्ध देशमुखला (Aniruddha Deshmukh)अश्रू अनावर झाले… अन् अनिरूद्ध रडला असल्याचं बोललं जातंय.

अरुंधतीच्या ‘सुखाचे चांदणे’

अरुंधतीचं मच वेटेड गाणं आता रिलिज झालं आहे. अरुंधतीचं ‘सुखाचे चांदणे’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे… अंतरावर परसलेले टिपूरसे… सुखाचे चांदणे’, असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातील शब्द आणि अरुंधतीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. या गाण्याला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळतोय. संगीतकार निलेश मोहरीर यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. गायिका विद्या करलगिकर यांनी गायलं आहे.

स्टार प्रवाहची इन्स्टाग्राम पोस्ट

स्टार प्रवाह वाहिनीने या गाण्यासंदर्भात पोस्ट केली आहे. “हरवलेली स्वप्नं होती थबकलेली पाऊले… पण तुझ्या भेटीत आता गवसले… ‘सुखाचे चांदणे’…” असं स्टार प्रवाहने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आई कुठे काय करते

सामान्य कुटुंबातली एक स्त्री फक्त तिचं कुटुंब, तिची मुलं, तिचा संसार यातच रमलेली… पण नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर तिची आवड जोपासायला लागते. गाणं गाते… तिच्या या प्रवासात तिच्या मुलांची तिला साथ लाभते, अशी या मालिकेची गोष्ट आहे. पुढे या मालिकेत काय होणार हे पाहणं रंजक असणार आहे.

संबंधित बातम्या

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आर्या आंबेकरचं खास गाणं ‘भरली उरा मधी’ प्रेक्षकांच्या भेटीला

काय घालायचं ज्याचा त्याचा प्रश्न, दिशा पाटनीच्या बिकिनी अवताराला तुम्ही म्हणणार, नार गुलजार!

“बुरखा-हिजाबला माझा विरोधच पण…”, कर्नाटक हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर संतापले

'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा
भविष्यात MPSC ची मोठी भरती; मुख्यमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा.
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला
'अंदर की बात है...', विरोधकांच्या घोषणाबाजीवर फडणवीसांचा मिश्कील टोला.
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट
कबरीच्या वादामुळे बीबी का मकबरा परिसरातही पसरला शुकशुकाट.
नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?
नागपुरातील हिंसाचाराचा मास्टरमाईंड समोर, कोण आहे फहीम खान?.
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.