Aai Kuthe Kay Karte : घरच्यांनी घेतला अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय, अरुंधती घेणार मोठा निर्णय

अरुंधती एक मोठा निर्णय घेतेय. तो म्हणजे देशमुखांचं 'समृद्धी' हे घर सोडण्याचा. तिच्या या निर्णयानंतर मालिकेत बरेच बदल होतील.

Aai Kuthe Kay Karte : घरच्यांनी घेतला अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय, अरुंधती घेणार मोठा निर्णय
अरुंधती-आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 11:28 AM

आयेशा सय्यद, मुंबई : सध्या ‘आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत अग्रस्थानी आहे. या मालिकेत काय घडतं, काय बिघडतं हा सर्वांच्या उत्सुकतेचा विषय असतो. मालिकेतील अरुंधती (Arundhati) हे पात्र तर सध्या चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. अरुंधतीचा साधेपणा सगळ्यांच भावतोय. पण आता तुमची लाडकी अरुंधती बदलतेय. तिच्या जीवनात, राहणीमानात बरेच बदल होत आहेत. पण घरातली मंडळी अरुंधतीच्या चारित्र्यावर संशय घेतात. त्यामुळे अरुंधती एक मोठा निर्णय घेतेय. तो म्हणजे देशमुखांचं ‘समृद्धी’ (Samruddhi) हे घर सोडण्याचा. तिच्या या निर्णयानंतर मालिकेत बरेच बदल होतील. आता अरुंधतीचा हा निर्णय तिची मुलं आणि घरातील इतर मंडळी स्विकारतात का?, हे पाहणंही महत्वाचं असेल.

अरुंधती घेणार मोठा निर्णय

सध्या आई कुठे काय करते या मालिकेत सध्या मोठे बदल होताना पहायला मिळत आहेत. या मालिकेतील अरुंधती या पात्राच्या आयुष्यात सर्वच अर्थाने बदल होत आहेत. सध्या अरुंधती साडी सोडून पंजाबी ड्रेस घालताना बघायला मिळतेय. तिचं हे बदललेलं रुप घरातल्या काही मंडळींना आवडतंय तर काहींना नाही. गाण्याचं रेकॉर्डिंग करून परत आल्यानंतर तिनं घातलेला ड्रेस पाहून घरातले आश्चर्यचकित होतात. अनिरुद्धने तिच्या ड्रेस घालण्यावर आणि मित्रासोबत म्हणजेच आशुतोष केळकरसोबत बाहेर राहण्यावर आक्षेप घेतो. “मित्रासोबत रात्र घालवून आली आहेस”, असं अनिरुद्ध म्हणताच अरुंधतीला राग येतो आणि ती दुखावते आणि देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेते. तर दुसरीकडे यशला, अप्पांना आणि अनघाला अरुंधतीनं घातलेला ड्रेस आवडलाय.

तुमची लाडकी अरुंधती देशमुखांचं घर सोडणार आहे. मालिकेच्या आजच्या भागात हा बदल बघायला मिळेल. अरुंधती आणि आशुतोष केळकर कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांना तिथे एकत्र राहण्याचा प्रसंग येतो. तिथून घरी परतल्यावर अनिरुद्ध तिला आशुतोषसोबत राहिल्याबद्दल जाब विचारतो. त्याचा अरुंधतीला राग येतो आणि ती देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेते. “माझ्या मुलांसमोर माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला मला चालणार नाही”, असं ठणकावून सांगत ती सम्रृद्धी बाहेर जाण्यास निघते. यापुढे काय होणार हे आता आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

अरुंधतीच्या राहणीमानात बदल

तुमचा विश्वास बसणार नाही पण तुमची लाडकी अरुंधती बदलली आहे. अरुंधती आता साडीत नाही तर ड्रेसमध्ये तुम्हाला पहायला मिळतेय. इथून पाठीमागे फक्त साडीत वावरणारी अरुंधती आता आपल्या पंजाबी ड्रेसमध्ये घालताना दिसतेय. तिचं हे रुप पाहून तिचा मित्र आशुतोष केळकर अवाक झाला. अरुंधती आणि आशुतोष केळकर यांची आता चांगलीच गट्टी जमू लागली आहे. याची मैत्री दिवसेंदिवस फुलत चालली आहे. अरुंधती या पात्रात होणारा हा बदल तिच्या कक्षा रुंदावण्याचं उदाहरण आहे. तिच्यातला बदल अनेकांना भावतोय.

आई कुठे काय करते ही मालिका चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या मालिकेत काय घडतं याकडे चाहते लक्ष देऊन असतात. आता मालिकेत एक मोठा बदल बघायला मिळतोय. अरुंधती आता देशमुखांचं घर सोडणार आहे. तिच्यात होणारा बदल आवडल्याचं अनेकांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे.

संबंधित बातम्या

Bappi lahiri passed away : सोनेरी आवाजाचे धनी बप्पी लाहिरी यांची संपत्ती किती आहे? जाणून घ्या…

Bappi Lahiri | तम्मा तम्मा ते तुने मारी एन्ट्रिया, डिस्को किंग बप्पी लाहिरींची सुपरहिट गाणी!

Rani Chatterjee | लाल ड्रेसमध्ये राणी चॅटर्जीचा बोल्ड लूक, फोटो पाहाच!

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.