Aai kuthe Kay Karte | आत्महत्येचा प्रयत्न की फक्त नाटक, अंकिताचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड होणार?

अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता.

Aai kuthe Kay Karte | आत्महत्येचा प्रयत्न की फक्त नाटक, अंकिताचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड होणार?
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 5:03 PM

मुंबई : प्रेक्षकांची आवडती मालिका ‘आई कुठे काय करते‘ (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अभिच्या साखरपुड्याच्या निमित्ताने देशमुख कुटुंब गावातील घरी राहायला गेले होते. आधी देशमुखांच्या घरात संजना येऊन धडकली असताना, आता अंकिताच्या रुपाने नवीन वादळ धडकलं आहे. अभि-अनघाचं लग्न मोडत अंकिताने अभिषेकला आपल्याशी लग्न करायला भाग पाडलं आहे (star pravah Aai kuthe Kay Karte latest episode new promo Ankita will caught by abhi).

अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याची बातमी ऐकून संतापलेल्या अंकिताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, साखरपुडा सुरु असतानाच ही घटना अंकिताच्या आईने अभिषेकला सांगितल्यामुले तो साखरपुडा सोडून थेट अंकिताकडे पोहोचला होता. तर, अभिची वाट बघत असलेल्या अनघाला मात्र तो थेट लग्नच करून आल्याने धक्का बसला. मात्र, अंकिता आत्महत्या करत असल्याने मला नाईलाजास्तव लग्न करावे लागल्याचे म्हटले होते.

मात्र, आता अंकिताने खोटेपणा करून केवळ हा बनाव केल्याची शक्यता घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात येत आहे. तर, आता यशने देखील अभिला अंकिताने हे केवळ नाटक केले असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे अभिने देखील अंकिताची कानउघडणी करत, जर या सगळ्या गोष्टी खऱ्या निघाल्या तर, त्याक्षणी घरातून बाहेर निघून जा, असे बाजावले आहे. तो स्वतः या प्रकारांची चौकशी करणार असल्याने, आता अंकिताचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड होणार का?, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

पाहा नवा प्रोमो :

 (star pravah Aai kuthe Kay Karte latest episode new promo Ankita will caught by abhi)

संजनासोबत लग्न करण्यास अनिरुद्धचा नकार?

आता अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटाचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागला आहे. मात्र, इतके दिवस अरुंधतीसोबत राहून आता अनिरुद्धला आपल्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. त्याने आधी अरुंधतीला आपला घटस्फोटाचा निर्णय मागे घेण्याविषयी विचारणा करतो. मात्र, अरुंधती याला पूर्णपणे नकार देते. आता द्विधा मनःस्थिती अडकलेला अनिरुद्ध थेट अप्पांकडे पोहोचला आहे.

अप्पांकडे जाऊन अनिरुद्ध आपल्या मनातील सगळ्या दुविधा त्यांच्यासमोर व्यक्त करतो. अनिरुद्ध अप्पांना सांगतो की, ‘मला संजानाशी लग्न करायचं नाही. तर, अजूनही मला अरुंधतीबरोबरच संसार करायचा आहे. मी चुकलो.’ यावेळी त्याने आपल्याला या कचाट्यातून सोडवा अशी विनंती देखील त्याने अप्पांना केली आहे. यावर अप्पा त्याला म्हणतात की, ‘अनिरुद्ध तू हा विचार करायला खूप उशीर केला आहेस. मात्र आता तुझ्याकडे हा विचार करायला वेळ नाही आणि आता तू मागे फिरू शकत नाहीस. आता सगळंच बदललं आहे.’

अनिरुद्ध अप्पांपुढे या गोष्टी काबुल करत असताना अचानक मागून आलेल्या संजनाने त्या दोघांच्या गोष्टी ऐकल्या आहेत. अनिरुद्धला आता आपल्याशी लग्न करायचे नाही, हे ऐकून संजनाला देखील मोठा धक्का बसला आहे. तर आता या सगळ्यावर अरुंधती काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(star pravah Aai kuthe Kay Karte latest episode new promo Ankita will caught by abhi)

हेही वाचा :

अभिनेत्री हनिया आमीरच्या इन्स्टाग्राम लाईव्हदरम्यान चाहत्याचे घृणास्पद कृत्य, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

Video | मुंबईचा पाऊस पाहून राखी सावंतला आठवलं ‘टिप टिप बरसा पानी..’, माध्यमांचे कॅमेरे पाहताच धरला ठेका!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.