आम्हीही आंतरजातीय विवाह केला, तरीही तू स्वीकारलंस! मग कीर्तीच्या आईला का नाही जमलं?, अभिनेत्रीची पोस्ट होतेय व्हायरल!

औरंगाबादमधील पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने बहिणीचं मुंडकं उडवल्याच्या प्रकरणात (Aurangabad Kirti Thore  Murder) आता कलाकारांनीही आपली मत मांडण्यास सुरुवात केली आहे.

आम्हीही आंतरजातीय विवाह केला, तरीही तू स्वीकारलंस! मग कीर्तीच्या आईला का नाही जमलं?, अभिनेत्रीची पोस्ट होतेय व्हायरल!
Minakshee Rathod
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 3:20 PM

मुंबई : औरंगाबादमधील पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने बहिणीचं मुंडकं उडवल्याच्या प्रकरणात (Aurangabad Kirti Thore  Murder) आता कलाकारांनीही आपली मत मांडण्यास सुरुवात केली आहे. कीर्तीच्या लग्नामुळे वडील संजय मोटेही नाराज होते. तर मुलाने बहिणीचं मुंडकं छाटल्यानंतर (Honor Killing) आई त्या कापलेल्या डोक्यालाही शिव्या घालत असल्याचं बोललं जातं आहे. सगळ्याच स्तरातून या क्रूर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

कुटुंबाच्या परवानगीविना पळून जाऊन प्रेम विवाह केल्याच्या रागातून कोयत्याने वार करत संकेतने कीर्तीचं डोकं उडवलं होतं. मृत्यूच्या वेळी कीर्ती दोन महिन्यांची गरोदर होती. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगावात दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. हत्या केल्यानंतर आरोपी भावाने वैजापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. या प्रकरणावर आता मराठी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिची पोस्ट व्हायरल होते आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

‘आई… 1)मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताईचा.

2) माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला  त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा!

पण कायम  उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा  तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!

3) काल परवा आपल्या लहान मुलीचं ही  intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस!  हे स्विकाराचं बीज तुला कुठे गवसलं?

आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास?  ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?

हे असच  “कीर्ती थोरे “च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते.  तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा  इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्यासारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचं बियाणं सापडूदे आई!

काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट,  आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag  खर्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!’, अशी भावनिक पोस्ट ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’ फेम मीनाक्षी राठोडने लिहिली आहे.

पाहा पोस्ट :

या पोस्टमध्ये मीनाक्षीने आपल्या आंतरजातीय विवाह यावर भाष्य केलं आहे. तसंच आपल्या मुलींनी आंतरजातीय विवाह केल्यानंतरही आईने ते ज्या पद्धतीने हाताळलं, ते कीर्तीची आई का करू शकली नाही?, असा सवालही तिने उपस्थित केला.

नेमकं प्रकरण काय?

19 वर्षीय कीर्तीने कॉलेजमधील मित्राशी विवाह केला होता. हा आंतरजातीय विवाह नव्हता, मात्र परवानगी न घेता पळून जाऊन कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवल्याच्या भावना मोटे कुटुंबाच्या मनात होती.

बहिणीला भेटायचे निमित्त साधत कीर्ती चहा बनवत असताना स्वयंपाकखोलीत जाऊन संकेतने मागून कोयत्याने सपासप वार केले, तर आईने तिचे पाय धरुन ठेवले. बहिणीचं डोकं शरीरापासून वेगळं होईपर्यंत तो वार करत राहिला. कळस म्हणजे त्यानंतर छाटलेल्या मुंडक्यासोबत मायलेकाने सेल्फीही काढला होता. परंतु तो नंतर डिलीट करण्यात आला. पोलीस हा डेटा रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक म्हणजे छाटलेल्या मुंडक्यालाही आई शिव्या घालत असल्याचं काही जणांनी सांगितलं.

हेही वाचा :

Urfi Javed | निळ्या बिकिनीमध्ये उर्फी जावेदने वाढवला इंटरनेटचा पारा, हॉट फोटो पाहून चाहते म्हणतायत…

Anushka Sharma | ‘निदान आतातरी तुमच्या घरातील बांधकामाचा आवाज बंद होईल…’, अनुष्काकडून कॅट-विकीला हटके शुभेच्छा!

Ananya Panday | नैन गुलाबी चैन गुलाबी, ‘बबली गर्ल’ अनन्या पांडेचा ‘गुलाबी’ अवतार पाहून चाहते म्हणतायत…

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.