Bigg Boss 16 | सुंबुल तौकीर हिच्या वडिलांवर शालिन भनोटचे वडील संतापले, बिग बाॅसविरोधात संपाताची लाट

काही कारण नसताना सुंबुल रडत रडत शालिनजवळ जात त्याच्या गळ्याला पडू लागली आणि त्याला भडकून देत होती.

Bigg Boss 16 | सुंबुल तौकीर हिच्या वडिलांवर शालिन भनोटचे वडील संतापले, बिग बाॅसविरोधात संपाताची लाट
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 11:04 PM

मुंबई : बिग बाॅस 16 मधील वादग्रस्त सदस्य म्हणून सुंबुल ताैकीर खानचे नाव पुढे येत आहे. एमसी स्टॅन आणि शालिन भनोटमध्ये काही दिवसांपूर्वी जोरदार भांडण झाले. यावेळी हे भांडण सुरू असताना शालिनसोबत सुंबुल होती, परंतू यावेळी तिचे कृत्य काहीतरी वेगळेच दिसत होते. काही कारण नसताना सुंबुल रडत रडत शालिनजवळ जात त्याच्या गळ्याला पडू लागली आणि त्याला भडकून देत होती. तिच्या अॅंक्सन काहीतरी विचित्र वाटत होत्या. हे पाहून सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. याच प्रकरणावरून सलमान खान देखील सुंबुलवर प्रचंड रागावला. मात्र, माझ्या मनात असे काहीच नसल्याचे सुंबुल सलमान खानला सांगत होती.

सुंबुलची शालिनसोबतची अॅंक्शन सर्वत्र चर्चेचा विषय ठरलीये. सुंबुलला समजवण्यासाठी तिच्या वडिलांचा काॅल घेण्यात आला. बिग बाॅसने तिच्या वडिलांची तब्येत खराब असल्याचे सांगत तिला वडिलांसोबत बोलण्याची परवानगी दिली. यावेळी तिच्या वडिलांनी शालिन आणि टीनावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली.

सुंबुलच्या वडिलांनी तिला म्हटले की, शालिन आणि टीना यांना त्यांची आवकात टीव्हीवर दाखव आणि त्यांच्यापासून दूर राहा. तसेच यावेळी तिला बिग बाॅसच्या घराबाहेर नेमके काय सुरू आहे, हे देखील तिच्या वडिलांनी सांगितले आहे.

सुंबुलच्या वडिलांचे आणि तिचे बोलणे बिग बाॅसने देखील टीव्हीवर दाखवले आहे. सुंबुलचे वडील शालिनला बऱ्याच चुकीच्या गोष्टी बोलताना दिसले. आता यावर शालिन भनोटच्या वडिलांनी संताप व्यक्त करत सुंबुलच्या वडिलांवर टीका केलीये.

बिग बाॅसच्या घरात सुंबुल देखील एक स्पर्धेक असताना तिच्या वडिलांना तिला कसे बोलू दिले, असे म्हणत शालिनच्या वडिलांनी टीका केलीये. इतकेच नाही तर एखाद्याला आवकात दाखवा, असे हे कसे बोलू शकतात असेही शालिनचे वडिल म्हणाले आहेत.

शालिनच्या वडिलांनी सुंबुल आणि तिच्या वडिलांमध्ये झालेल्या संभाषणाला घटिया असल्याचे देखील म्हटले आहे. मुळात म्हणजे बिग बाॅसच्या घराबाहेर नेमके काय सुरू आहे, हे एखाद्या स्पर्धकाच्या घराच्यांनी सांगणे चुकीचे आहे, आता यावर सोशल मीडियावर देखील अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.