सुंबुल ताैकीर हिने एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या वादावर सोडले माैन, म्हणाली, मैत्रीही…

बिग बॉस 16 ने प्रेक्षकांचे फुल मनोरंजन केले आहे. बिग बॉस 16 हे टीआरपीमध्येही टाॅपला राहिले आहे. बिग बॉस 16 चा फिनाले होऊन बरेच दिवस झाले आहेत, तरीही बिग बॉस 16 च्या घरातील सदस्य हे प्रचंड चर्चेत आहेत. मंडलीला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले.

सुंबुल ताैकीर हिने एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या वादावर सोडले माैन, म्हणाली, मैत्रीही...
Follow us
| Updated on: Mar 27, 2023 | 2:25 PM

मुंबई : बिग बॉस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, असे असताना देखील बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चे सदस्य प्रचंड चर्चेत आहेत. अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादामुळे अनेक चर्चा रंगल्या आहेत. अब्दू रोजिक (Abdu Rozik) याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस 16 च्या सीजनमध्ये खरी मैत्री बघायला मिळाली. विशेष म्हणजे ही मैत्री शेवटपर्यंत टिकून होती. मंडलीपैकीच एकजण बिग बॉस 16 जिंकावे असे सर्वांना वाटत होते आणि शेवटी तेच घडले. एमसी स्टॅन (MC Stan) हा बिग बॉस 16 चा विजेता झाला. एमसी स्टॅन हा विजेता झाल्यानंतर शिव ठाकरे याने त्याला उचलून घेत आनंद व्यक्त केला.

शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अब्दू रोजिक, साजिद खान, सुंबुल ताैकीर आणि निम्रत काैर यांच्यामध्ये एक खास मैत्री ही बिग बॉस 16 मध्ये बघायला मिळाली. यांनी बिग बॉस 16 च्या घरात धमाल देखील केली, यांच्या मैत्रीला अर्चना गाैतम हिने मंडली असे नाव दिले. अब्दू रोजिक हा बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यानंतर सर्वच सदस्य रडताना दिसले.

बिग बॉस 16 च्या सदस्यांसाठी फराह खान, सलमान खान यांनी खास पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये मंडलीमधील सदस्य धमाल करताना दिसले. या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही दिवसांपूर्वी अब्दू रोजिक याने धक्कादायक खुलासा करत म्हटले की, खतम मंडली…अब्दू रोजिक याचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला.

अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये वाद सुरू आहे. इतकेच नाहीतर काही दिवसांपूर्वीच अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन यांच्यावर गंभीर आरोपही केले. आता यांच्या या वादावर मंडलीतील सदस्य सुंबुल ताैकीर हिने मोठे भाष्य केले आहे. यापूर्वी शिव ठाकरे यानेही एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्या वादावर मोठे भाष्य केले होते.

सुंबुल ताैकीर म्हणाली की, अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन हे दोघेही खूप जास्त फेमस असल्याने यांच्या वादाची चर्चा रंगत आहे. प्रत्येक मैत्री खालच्या पातळीवरून जात असते. मला असे वाटते की, वेळ हा प्रत्येक समस्येवर उपाय आहे, आताही सर्वकाही वेळेवर सोडायला हवे. एमसी स्टॅन हा अब्दू रोजिकवर खूप प्रेम करतो, यामुळे पुन्हा सर्व काही ठीक होईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.