Bigg Boss 16 | बिग बाॅसच्या घराबाहेर पडताच सुंबुल ताैकीर हिने टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्याबद्दल केले मोठे विधान, म्हणाली…
अशाप्रकारे टास्क खेळणे चुकीचे आहे आणि तू फक्त टास्कच्या माध्यमातून राग काढत होती हे दिसत असल्याचे देखील करण जोहर म्हणाला.
मुंबई : फिनाले विक बिग बाॅसच्या घरात सुरू झालाय. आता बिग बाॅसच्या घरात फक्त सहा स्पर्धेक आहेत आणि यापैकीच एकजण हा बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) चा विजेता होणार आहे. करण जोहर याने विकेंडचा वार हाॅस्ट केलाय. यावेळी करण जोहर याने अर्चना गाैतम हिचा चांगलाच क्लास लावला. टाॅर्चर टास्कमध्ये अर्चना गाैतम हिने शिव ठाकरे याच्या डोळ्यांमध्ये मीठ, हळद आणि निरमा टाकल्यामुळे शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या डोळ्याला मोठी दुखापत झालीये. इतकेच नाही तर शिव ठाकरे याला डोळा उघडणे देखील कठीण झाले. विकेंडच्या वारमध्ये शिव ठाकरे याचा डोळा पुर्ण लाल दिसत होता. यावर करण जोहर (Karan Johar) याने अर्चनाचा क्लास लावला. अशाप्रकारे टास्क खेळणे चुकीचे आहे आणि तू फक्त टास्कच्या माध्यमातून राग काढत होती हे दिसत असल्याचे देखील करण जोहर म्हणाला. मात्र, अर्चना गाैतम हिला आपण केलेल्या चुकीचा अजिबात पश्चाताप नसल्याचे दिसून आले.
सुंबुल ताैकीर, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे नाॅमिनेट होते. आता सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरातून बेघर झालीये. बिग बाॅस १६ च्या घरातून जाताना सुंबुल म्हणाली की, बिग बाॅस १६ चा विजेता हा मंडळीमधूनच व्हायला हवा.
View this post on Instagram
सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तिने एका मुलाखतीमध्ये मोठे विधान केले आहे. सुंबुल म्हणाली की, आयुष्यामध्ये कधीच टीना दत्ता आणि शालिन भनोट यांना भेटणार नाहीये.
टीना दत्ता ही फक्त माझ्याबद्दलच नाही तर माझ्या वडिलांबद्दल देखील चुकीचे बोलली आहे. घरातील भांडणामध्ये प्रत्येक वेळी तिने मला अपमानित केले आहे. कधीच तुमचे मित्र असे करत नाहीत. तिने अनेकदा माझ्या वडिलांना देखील अपमानित केले.
बिग बाॅसच्या घरात असताना सुंबुल ज्यावेळी टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यासोबत राहत होती, त्यावेळी ती अत्यंत चुकीची दिसत होती. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अब्दू, निम्रत, साजिद खान आणि सुंबुल यांची मैत्री प्रेक्षकांना देखील आवडलीये.