एक्स गर्लफ्रेंड परत आली तर तिला स्वीकारणार का? सूरज चव्हाणची विजेता झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया

सूरजने आपल्या एक्स गर्लफ्रेंडबाबत बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसोबत बोलताना माहिती दिली होती. त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेतलं नव्हतं. पण तो तिला लाडात बच्चा म्हणायचा. बिग बॉसच्या घरातही त्याने बच्चा म्हणत तिची आठवण काढली होती. याच बच्चाबाबत त्याला प्रश्न विचारला असता त्याने आपलं मत मांडलं.

एक्स गर्लफ्रेंड परत आली तर तिला स्वीकारणार का? सूरज चव्हाणची विजेता झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
सूरज चव्हाण
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 4:47 PM

‘बिग बॉस मराठी’ सीझन पाचच्या विजयानंतर रिल्सस्टार सूरज चव्हाण याचं राज्यभरात कौतुक होत आहे. राज्यभरातून अनेक दिग्गज कलाकारांकडून सूरजचं अभिनंदन केलं जात आहे. बिग बॉस मराठी जिंकल्यानंतर सूरज चव्हाण याने ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्याला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तसेच एक्स गर्लफ्रेंड आता यशस्वी झाल्यानंतर परत आली तर स्वीकारणार का? असा प्रश्न सूरज चव्हाणला विचारण्यात आला. त्यावर त्याने मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. सूरजने आपल्या एक्स गर्लफ्रेंडबाबत बिग बॉसच्या घरात इतर स्पर्धकांसोबत बोलताना माहिती दिली होती. त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचं नाव घेतलं नव्हतं. पण तो तिला लाडात बच्चा म्हणायचा. बिग बॉसच्या घरातही त्याने बच्चा म्हणत तिची आठवण काढली होती. याच बच्चाबाबत त्याला प्रश्न विचारला असता त्याने आपलं मत मांडलं.

बच्चा परत आली तर तिच्यासोबत लग्न करणार का? असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला. त्यावर त्याने “बच्चाला बच्चा झालाय ना, आता कसं करु? बच्चाला बच्चा झालाय. आता नाही करु शकतं. आता नवीन बघायचं. साधा सिंपल माझा पिलू. एक नंबर क्वालिटी”, असं सूरज चव्हाण म्हणाला. तसेच “घनश्यामचं काय, घनश्याम म्हणतो, तुझं लग्न ठरल्यावर आम्ही किती दिवस आधी येऊ? मी म्हटलं 10 दिवस आधी ये. तू माझा भाऊच आहे”, असं सूरज चव्हाण यावेळी म्हणाला.

‘…म्हणून मी ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकली’

“आई-आप्पाचा माझ्यावर आशीर्वाद आहे. हे संपूर्ण यश त्यांचं आहे. त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून मी ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकली”, असं सूरज चव्हाण यावेळी म्हणाला. तसेच “माझ्या गावात भरपूर डीजे लागले आहेत. भरपूर लांबून डीजे आले आहेत. ते माझी वाट बघत आहेत की, कधी आमचा सूरज भाऊ येतोय आणि आम्ही कधी त्याला खांद्यावर घेऊन नाचवतोय”, असं सूरज चव्हाण याने यावेळी सांगितलं. बिग बॉसला गेल्यानंतर गावी गेल्यावर सर्वात आधी काय करणार? असा प्रश्न सूरजला विचारण्यात आला. त्यावर त्याने आपलं घर बांधायचं असल्याचं सांगितलं.

गावी गेल्यावर सर्वात आधी काय करणार?

“मला सर्वात आधी माझं घर बांधायचं आहे आणि त्या घराला बिग बॉसचं नाव द्यायचं आहे. कारण बिग बॉस माझे आई-वडील होते. त्यांनी मला समजून घेतलं. मला जास्त बोलता येत नव्हतं, बोलायला खूप येतं, पण तिथे बोलण्याइतकं येत नव्हतं. कारण नॉमिनेशनला कारणं सांगणं जमत नव्हतं. नाहीतर मला इतर सर्व जमत होतं”, असं सूरज म्हणाला.

सूरजला यावेळी त्याच्या कॉस्ट्यूमबद्दल प्रश्न विचारण्याक आला. त्यावर त्याने “ही कॉस्ट्यूम, शर्ट आणि पँट माझ्या ताईने बनवलं आहे. मला बिग बॉसच्या घरात उठून दिसण्यासाठी असे कपडे बनविले आहेत. माझे डायलॉग कपड्यांवर आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

‘मी कुणाला भीत नाही’

यावेळी सूरजला बिग बॉसच्या घरातील टास्कबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली. “मी कुणाला भीत नाही. माझी बॉडी नसली तरी मी कुणाला आवरत नाही. मी एकदा घुसलो तर घुसलो. मग समोर कितीही असूदे. मी भीत नसतो. ते काय व्हायचं, आम्ही इकडे भरपूर जण. तिकडे मुली होत्या. तिकडे मुली होत्या आणि इकडे आम्ही अरबाज, वैभव, डीपी दादा, मी आणि त्यांच्याकडे संग्राम होता. तर मला आमच्या टीमचा लयी राग यायचा. त्यामुळे मी डोकं हाणून घ्यायचो. मला इकडे बिग बॉस का पाठवलं? तिकडे बिचाऱ्यांची टीम हलकी आहे. तिकडे कुणतरी वजनदार हवं ना? तिकडे कोणच नव्हतं”, असं सूरज म्हणाला.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.