पहिल्या भेटीच्या वेळीच सुशांत झाला होता नाराज, अंकिता लोखंडेने शेअर केल्या जुन्या आठवणी!

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ही जोडी पहिल्यांदा एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘पवित्र रिश्ता’मध्ये दिसली होती.

पहिल्या भेटीच्या वेळीच सुशांत झाला होता नाराज, अंकिता लोखंडेने शेअर केल्या जुन्या आठवणी!
Ankita-sushant
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 8:44 AM

मुंबई : बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ही जोडी पहिल्यांदा एकता कपूरच्या प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘पवित्र रिश्ता’मध्ये दिसली होती. या शोमध्ये या जोडीने ‘अर्चना’ आणि ‘मानव’ची भूमिका साकारली होती. जिथे आता या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रसारित केला जाणार आहे.

अलीकडेच, द क्विंटला दिलेल्या खास मुलाखतीत अंकिताने सुशांत सिंह राजपूतसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे. अंकिता म्हणते, ‘आमची पहिली भेट खूप विचित्र होती. मला वाटते की, मी त्याच्यासोबत खूप विचित्र वागले. शाहीर शेख सारखा सुशांत हा अतिशय शांत स्वभावाचा होता. मला वाटले की, तो फक्त त्याच्या कामात व्यस्त आहे. आम्हाला या शोच्या प्रोमो शूटसाठी जायचे होते. मला आठवते की, तो माझ्या घरी मला घ्यायला आला होता. माझी आई सुद्धा मला खाली सोडायला आली होती. मला खूप उशीर झाला होता. माझे केस आणि मेकअप माझ्या घरी सकाळी 4 पासून सेट केले जात होते. 5 वाजता सुशांत मला घ्यायला आला होता.’

पहिल्याच भेटीत रागवला सुशांत

अंकिताने पुढे सांगितले की, ‘मी माझ्या घरातून 6 वाजता खाली आले, तेव्हा सुशांत माझ्यावर खूप रागावला होता. मी घरातून खाली येताच आईसोबत त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर बसलो, हळूहळू मला झोप लागली. त्यानंतर त्याला खूप राग आला, कारण आधी मी उशिरा आले होते आणि मी येताच मला झोप लागली. त्यानंतर त्याने चालकाकडून कार स्वतःच्या ताब्यात घेतली आणि आपली कार वेगाने चालवायला सुरुवात केली. ते हे का करत आहेत, हे मला समजले नाही. माझ्या आईने मला त्या वेळी सांगितले की, तो खूप रागावला आहे. मी यावेळी विचार केला की, मी आता काय करू शकते? तो माझ्या घरी वरच्या मजल्यावर यायला हवा होता. पण सुशांतशी माझी पहिली भेट अशीच काहीशी होती. त्याला वाटले की, बाप रे गाडीत बसताच ही झोपी गेले, त्यात ही आपली नायिका आहे.

6 वर्षांची रिलेशनशिप

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे संबंध 2010 ते 2016 पर्यंत टिकले, त्यानंतर ही जोडी एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त झाली. सुशांतने 3 वर्षांनंतर ‘पवित्र रिश्ता’ या शोला अलविदा म्हटले आणि चित्रपटांमध्ये त्याचा प्रवास सुरू केला.

हेही वाचा :

Kangana Ranaut : जयललिता असत्या तर कंगनाऐवजी ‘या’ अभिनेत्रीला मिळाली असती बायोपिकमध्ये काम करण्याची पहिली संधी

Gautami Deshpande: छबिदार सुरत देखणी, जणू हिरकणी, नार गुलजार… गौतमी देशपांडेचा अस्सल मराठमोळा अंदाज पाहाच!

Sapna Choudhary | आधी अपघाती मृत्यूच्या अफवेची जोरदार चर्चा, आता सपना चौधरीच्या नव्या व्हिडीओमुळे चाहते आनंदी! 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.