Taarak Mehta: ‘तारक मेहता’मधील आत्माराम भिडेच्या निधनाची अफवा; अखेर इन्स्टाग्रामवर Live येत केली विनंती
सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. अनेकदा खात्री नसतानाही या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जातात आणि नंतर त्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. याचा सर्वाधिक फटका सेलिब्रिटींना बसतो.
सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल व्हायला फार वेळ लागत नाही. अनेकदा खात्री नसतानाही या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जातात आणि नंतर त्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतात. याचा सर्वाधिक फटका सेलिब्रिटींना बसतो. अशीच एक अफवा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत आत्माराम भिडे (Mandar Chandwadkar) यांची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांडवडकर यांच्याबाबत पसरवण्यात आली. मंदार यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली. त्यावर आता खुद्द त्यांनीच इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत नेटकऱ्यांना अशा अफवा (Death Hoax) न पसरवण्याची विनंती केली. त्याचसोबत ‘तारक मेहता..’च्या मालिकेतील सर्व कलाकार ठीक असल्याचंही त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले मंदार चांदवडकर?
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
“सोशल मीडियावर माझ्याविषयी अफवा पसरतेय. लोकांना माझी चिंता वाटू नये म्हणून मी लाइव्ह आलोय. कारण सोशल मीडियावर एखादी गोष्ट ही आगीपेक्षाही जलद गतीने पसरते. त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी इथे शूटिंग करतोय आणि मजेत आहे. ज्यांनी हे काम केलंय, त्यांना विनंती आहे की त्यांनी असं पुन्हा करू नये आणि देव त्याला सद्बुद्धी देवो. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील सर्व कलाकार तंदुरुस्त आहेत, चांगले आहेत. आम्ही पुढील अनेक वर्षांपर्यंत लोकांचं मनोरंजन करणार आहोत. त्यामुळे मी पुन्हा विनंती करतो की अशी अफवा पसरवू नका,” अशी विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली.
‘तारक मेहता..’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करतेय. या मालिकेत कलाकार घराघरात लोकप्रिय आहेत. गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे यांची भूमिका मंदार साकारतात. दुबईतील चांगली नोकरी सोडून ते मालिकेत काम करू लागले. त्यांना अभिनयाची फार आवड होती. त्यांनी नाटकातही काम केलंय.