Disha Vakani: हे माँ माताजी! दयाबेनचा बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!

टप्पूचे पप्पा आता बबिताला विसरलीत असं एकाने लिहिलंय. तर बापूंजींनी हा व्हिडीओ पाहिला तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. दिशाच्या अभिनयातील विविधतेवरही नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत.

Disha Vakani: हे माँ माताजी! दयाबेनचा बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का!
दयाबेनचा बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का! Image Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 8:20 AM

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यातील प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. या मालिकेत दयाबेनची (Dayaben) भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) प्रसूती रजेवर गेल्यानंतर पुन्हा परतलीच नाही. मध्यंतरीच्या काळात दिशा पुन्हा मालिकेत येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या चर्चांना नकारार्थी उत्तर देत पूर्णविराम दिला. यादरम्यान आता दिशा वकानीचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर दिशाच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिशाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळत आहेत. दिशाच्या Bhingri Ga Bhingri या म्युझिक व्हिडीओचा आहे. यामध्ये तिने ब्रालेट आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केला आहे. दिशाचा हा व्हिडीओ खूप जुना असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया येत आहेत. तारक मेहताच्या मालिकेत दिशा नेहमीच साडीमध्ये दिसायची. नेहमीच पारंपरिक पोशाखात दिसणाऱ्या दिशाचा हा वेगळाच अंदाज पाहून चाहते चकीत झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

टप्पूचे पप्पा आता बबिताला विसरलीत असं एकाने लिहिलंय. तर बापूंजींनी हा व्हिडीओ पाहिला तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसेल असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. दिशाच्या अभिनयातील विविधतेवरही नेटकऱ्यांनी कमेंट्स केले आहेत. 2017 मध्ये दिशाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडली होती. मात्र त्यानंतर ती पुन्हा मालिकेत परतलीच नाही. 2019 मध्ये ती फक्त पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.