तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला मोठा झटका, या व्यक्तीने केला कायमचा रामराम

प्रेक्षक देखील दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. मात्र, यादरम्यानच मालिकेला मोठा झटका बसला आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेला मोठा झटका, या व्यक्तीने केला कायमचा रामराम
Follow us
| Updated on: Jan 03, 2023 | 4:38 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. मात्र, काही वर्षांपासून मालिकेमधील कलाकार सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. या मालिकेला अनेक कलाकार कायमचा अलविदा करून जात आहेत. दयाबेन म्हणजे दिशा वकानी हिने देखील मालिकेमधून मोठा ब्रेक घेतला आहे. दयाबेन हे मालिकेमधील मुख्य पात्र आहे. प्रेक्षक देखील दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहात आहेत. टप्पू के पापा…टप्पू के पापा…हे वाक्य दयाबेनची ऐकायला चाहत्यांचे तरसले आहेत. इतकेच नाही तर मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे जेठालालचे परममित्र तारक मेहता यांनी देखील मालिकेला रामराम ठोकलाय.

गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेमधून अनेक मोठ्या कलाकारांनी एक्झिट घेतलीये. टप्पूचे पात्र साकारणारा राज अनादकट याने ही मालिका सोडली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने मालिका सोडण्याचे कारणही सांगून टाकले आहे.

आता तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला अजून एक मोठा झटका बसला आहे. 14 वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करणारे डायरेक्टर मालव राजदा यांनीही मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे. 15 डिसेंबरला त्यांनी शेवटचा एपिसोड केला.

प्राॅडक्शन हाउससोबत मालव राजदा यांचे मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. यावर आता राजदा म्हणाले की, जेंव्हा तुम्ही चांगले काम करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळी मतभेद कायमच होतात. मुळात म्हणजे प्राॅडक्शन हाउसमध्ये माझे काहीच देणे-घेणे नाहीये.

मुळात असित भाई मोदी आणि शोबद्दल मी कृतज्ञ आहे. 14 वर्ष एकाच शोमध्ये काम केल्यामुळे मी कुठेतरी कम्फर्ट झोनमध्ये गेलो होतो. यामुळेच मी बाहेर पडून स्वत: आव्हान देण्याचे ठरवले आहे. तारक मेहता का शोमधील 14 वर्ष माझ्यासाठी खास ठरली आहेत. कारण याशोमध्ये मला माझी प्रिया मिळाली.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.