तारक मेहता का उल्टा चश्मामधील पोपटलालने ‘या’ हॉलिवूड चित्रपटाने केली महत्वाची भूमिका…
पोपटलाल अर्थात श्याम पाठक यांनी फक्त तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्येच काम केले नसून त्यांनी चक्क एका हाॅलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. लस्ट कॉशन असे या बाॅलिवूड चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अनुपम खेर देखील दिसत आहेत.
मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ने (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी आणि खास जागा निर्माण केलीये. प्रेक्षकांच्या मनात मालिकेमधील प्रत्येक कलाकाराबद्दल एक वेगळे स्थान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही मालिका लोकांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. इतकेच नाही तर कितीही टेन्शन असेल आणि 20 मिनिट तारक मेहता का उल्टा चश्मा बघितले की, टेन्शन (Tension) दूर होते. या मालिकेचे जुने भागही प्रेक्षक अत्यंत आनंदाने बघतात. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
इथे पाहा पोपटलालचा व्हिडीओ
हे सुद्धा वाचाView this post on Instagram
पोपटलालने केली हाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका
तारक मेहता का उल्टा चश्माच्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना मोठी इच्छा असते. मालिकेतील कलाकरांच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहते खूप प्रेमही करतात. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारणारे पात्र म्हणजे पोपटलाल. श्याम पाठक हे पोपटलालचे खरे नाव आहे. मालिकेमध्ये दाखवण्यात आले आहे की, पोपटलालचे लग्न होत नाहीये, पोपटलाल तूफान पेपरचा पत्रकार असून गेल्या 15 वर्षांपासून लग्नासाठी मुलगी शोधतोय. पोपटलाल कायम कॅन्सल कॅन्सल बोलतो.
या चित्रपटात केली पोपटलालने भूमिका
पोपटलाल अर्थात श्याम पाठक यांनी फक्त तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्येच काम केले नसून त्यांनी चक्क एका हाॅलिवूड चित्रपटामध्ये काम केले आहे. लस्ट कॉशन असे या हाॅलिवूड चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात अनुपम खेर देखील आहेत. लस्ट कॉशन हा एक चाइनीज चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये श्याम पाठकची महत्वाची भूमिका आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये पोपटलालची भूमिका सर्वांनाच प्रचंड आवडते.