शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यामधील वाद संपेना, निर्मात्यावर केला मोठा आरोप

चाहते गेल्या काही दिवसांपासून सतत दिशा वकानी अर्थात आपल्या सर्वांची लाडकी दयाबेनची आतुरतेने वाट पाहात आहेत. मालिकेच्या सुरूवातीपासून असलेल्या अनेक कलाकारांनी मालिकेला कायमचा रामराम केलाय.

शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यामधील वाद संपेना, निर्मात्यावर केला मोठा आरोप
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 6:41 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन करत आहे. विशेष बाब म्हणजे घरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला ही मालिका आवडते. या मालिकेमधील टप्पू सेना ही लहान मुलांचा आवडतीचा विषय आहे. मालिकेमध्ये गोकुळधाम सोसायटी दाखवण्यात आलीये. या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत आनंदाने राहत सर्वच सणवार कशा पध्दतीने साजरे करतात हे दाखवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून मालिकेमधील कलाकार मालिका सतत सोडून जात असल्याने मालिका चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेमध्ये सर्वात महत्वाचे पात्र साकारणारी दिशा वकानी ही देखील काही वर्षांपासून मालिकेमध्ये दिसत नाहीये. दिशा वकानी मालिकेमध्ये कधी पुनरागमन करणार यावर मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी (Asit Kumarr Modi) हे आता काही भाष्य करत नाहीयेत. चाहते गेल्या काही दिवसांपासून सतत दिशा वकानी अर्थात आपल्या सर्वांची लाडकी दयाबेनची आतुरतेने वाट पाहात आहेत. मालिकेच्या सुरूवातीपासून असलेल्या अनेक कलाकारांनी मालिकेला कायमचा रामराम केलाय.

शैलेश लोढा अर्थात आपल्या सर्वांचे आवडते मेहता साहब यांनीही काही दिवसांपूर्वी मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे. शैलेश लोढा हे मालिकेमध्ये महत्वाच्या भूमिकेत होते. जेठालालचे परमित्र म्हणून मेहता साहब फेमस असून ते एक लेखक आहेत.

शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अनेकांनी सोशल मीडियावर शैलेश लोढा यांना मालिका सोडण्याचे कारणही विचारले होते. मात्र, यादरम्यान शैलेश लोढा यांनी शांत राहणे पसंद केले.

shailesh lodha

गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगत आहे की, शैलेश लोढा यांना त्यांच्या मेहनतीचे पैसे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेकडून मिळाले नाहीयेत. विशेष म्हणजे यावर नुकताच शैलेश लोढा यांनी भाष्य देखील केले.

शैलेश लोढा यांनी निर्मात्यांवर मोठा आरोप करत म्हटले होते की, अजूनही मालिकेमधील मानधन मिळाले नाहीये. शैलेश लोढा यांच्या आरोपावर असितकुमार मोदी यांनी म्हटले की, मी कोणाचेही पैसे ठेऊन घेत नाही.

आता शैलेश लोढा यांनी एक फोटो शेअर करत नाव न घेता असितकुमार मोदी यांनी टोला लगावला आहे. शैलेश लोढा यांनी स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मी खूप दिवसांपासून एकही विनोद ऐकला नाही, मग मी आता तुमचे खोटे ऐकले…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.