‘शैलेश लोढा’ने तारक मेहता मालिका सोडण्याचे कारण अखेर सांगितले, कधीही अभिनेत्यापेक्षा कोणताही निर्माता मोठा…
नेक सामाजिक संदेशही या मालिकेमधून दिले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रचंड चर्चेत आलीये. कारण या मालिकेमधील अनेक कलाकार हे मालिकेला कायमचा रामराम करून जाताना दिसत आहेत.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये मुंबईमधील (Mumbai) एक सोसायटी दाखवण्यात आलीये. विशेष म्हणजे या सोसायटीमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात आणि सर्वजण मिळून प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतात. या मालिकेमध्ये जेठालाल याच्यापासून अब्दुपर्यंत सर्वचजण प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करतात. अनेक सामाजिक संदेशही या मालिकेमधून दिले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रचंड चर्चेत आलीये. कारण या मालिकेमधील अनेक कलाकार हे मालिकेला कायमचा रामराम करून जाताना दिसत आहेत.
दयाबेन हिने सर्वात अगोदर मालिकेला सोडचिठ्ठी दिली आणि तेंव्हापासूनच अनेक कलाकारांनी मालिका सोडण्यास सुरूवात केली. दयाबेन अर्थात दिशा वकानी हिच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहताना प्रेक्षक दिसत आहेत. टप्पू के पापा हे शब्द ऐकण्यास चाहते आतुर आहेत. मात्र, दयाबेन मालिकेमध्ये कधी वापर येणार यावर असितकुमार मोदी देखील काहीच भाष्य करत नाहीयेत.
अंजली भाभीने देखील काही दिवसांपूर्वीच मालिका सोडली आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडल्यानंतर अनेकांनी मोठे आरोपही केले आहेत. काही दिवसांपूर्वी एक चर्चा होती की, मेहता साहब अर्थात शैलेश लोढा यांचे मानधन निर्मात्यांकडून अजूनही देण्यात आले नाही. यावर असित मोदी यांना विचारण्यात आले, त्यावेळी शैलेश लोढा यांचे नाव न घेता असित मोदी म्हणाले होते की, मी कधीही कोणाचेही पैसे ठेऊन घेत नाही.
यावर शैलेश लोढा यांनी नाव न घेता म्हटले होते की, शेवटी तुम्ही कधी खरे बोलले होता? यावरून हे तर स्पष्ट झाले आहे की, शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्यामध्ये काहीतरी बिनसले आहे. शैलेश लोढा यांना त्यांच्या कष्टाचे पैसे अजून मिळाले नाहीयेत. आता यावरच शैलेश लोढा यांनी मोठे भाष्य केले आहे.
साहित्य आजतकमध्ये बोलताना शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सोडण्याचे कारण सांगून टाकले आहे. शैलेश लोढा म्हणाले की, जे सोडून टाकले त्यावर काय बोलायचे? पण हा सध्या राष्ट्रीय प्रश्न तयार झालाय…पुस्तक प्रकाशित करणारे देशातील प्रकाशक हिऱ्याच्या अंगठ्या घालून फिरतात आणि लेखकाला स्वतःचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी पैसे द्यावे लागतात…
दुसऱ्यांच्या कलागुणांवरून कमावणारे उद्योगपती जर स्वत:ला हुशार आणि मोठे समजू लागले तर मग कोणीतरी प्रतिभावान व्यक्तीने उभे राहून आवाज उठवावा लागतो की, तुम्ही दुसऱ्यांच्या कलागुणांवरून कमावणारे लोक आहात. मी त्यापैकी आहे, ज्याने हा आवाज उठवला आहे. अभिनेत्यापेक्षा कोणताही निर्माता मोठा असू शकत नाही असेही शैलेश लोढा याने म्हटले. इशाऱ्यामध्ये शैलेश लोढा यांनी मालिका सोडण्याचे कारण सांगून टाकले आहे.