Dispute | या कारणामुळे शैलेश लोढा आणि तारक मेहताच्या निर्मात्यांमध्ये वाद, असित मोदी यांनी केली पोलखोल

| Updated on: May 02, 2023 | 8:14 PM

तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेला चाहत्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे या मालिकेतील कलाकार देखील कायमच चर्चेत असतात. त्यांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

Dispute | या कारणामुळे शैलेश लोढा आणि तारक मेहताच्या निर्मात्यांमध्ये वाद, असित मोदी यांनी केली पोलखोल
Follow us on

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) ही मालिका गेल्या तब्बल पंधरा वर्षांपासून चाहत्यांचे जबरदस्त असे मनोरंजन करताना दिसत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिका सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मालिकेतील अनेक कलाकार (Artist) हे मालिकेला कायमचा रामराम करून जाताना दिसत आहेत. अनेकांनी तर कायमची सोडचिठ्ठी ही मालिकेला दिलीये. अनेकांनी तर थेट मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावरही थेट आरोप केले आहेत. चाहते सतत दयाबेनच्या पुनरागमनाची वाट पाहताना दिसत आहेत. मात्र, असित मोदी (Asit Modi) यांनीही दयाबेनच्या पुनरागमनावर अजूनही काही भाष्य केले नाहीये.

गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील तारक मेहता अर्थात शैलेश लोढा हे असित मोदी यांच्यावर आरोप करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर यांच्यामधील वाद आता थेट कोर्टात जाऊन पोहचलाय. शैलेश लोढा यांचे पैसे असित मोदी यांनी अजूनही दिले नसल्याचा आरोप हा शैलेश लोढा यांनी केलाय. सतत यांच्याबद्दल चर्चा या सुरू आहेत.

काही दिवसांपूर्वीच शैलेश लोढा यांनी असित मोदी यांना कायदेशीर नोटीस पाठवलीये. मात्र, यांचा वाद इतका जास्त का वाढला? यावर चाहते सतत प्रश्न विचारताना दिसत होते. शेवटी असित कुमार मोदी यांनी शैलेश लोढा यांच्यासोबत वादचे नेमके कारण काय, यावर मोठा खुलासा केलाय. आता शैलेश लोढा आणि असित मोदी यांच्या वादाचे मुळ कारण हे पुढे आले आहे.

असित कुमार मोदी म्हणाले की, मला खरोखरच खूप जास्त वाईट वाटले आहे, कारण शैलेश लोढा याने ही परिस्थिती फार वेगळ्या प्रकारे हाताळली आहे. मला काही महिन्यापूर्वी शैलेश लोढा याने पाठवलेली नोटीस मिळाली आहे. मला तर अगोदर नोटीस पाठवण्याचे कारणच समजले नाही. कारण मी कधीच त्याचे पैसे देण्यास नकार हा दिला नाहीये.

नियमितपणे ईमेल आणि मेसेज पाठवून त्यांच्या प्रलंबित थकबाकीबाबत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. कारण त्याला सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या. हे प्रत्येक संस्थेत सुरू असते. पण त्यांना त्या प्रक्रिया पुर्ण करायच्या नव्हत्या. आम्हाला शेवटपर्यंत वाटत होते की, शैलेश हा मालिकेमध्ये पुनरागमन करेल. जेंव्हा बरीच वर्ष तुम्हीसोबत काम करतात तेंव्हा मतभेद होणे स्वाभाविक आहे.

शैलेशला बाहेर जाऊन काम करायचे होते, कवी संमेलनमध्ये जायचे होते. मात्र, तारक मेहता हा डेली सोप आहे. हे सर्व शक्य नाही. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही याबद्दल बोललो होतो. शैलेश हा त्याच्या आत्मसम्मानबद्दल बोलतो. तर मग आमचा देखील आत्मसम्मान आहे ना, त्याच्या कवितांमध्ये माझा उल्लेख करणे आणि मला टार्गेट करणे त्याला शोभत नाही. अखेर असित मोदी आणि शैलेश लोढा यांच्या वादाचे कारण पुढे आले आहे.