Kapil Sharma Show | कपिल शर्मा याच्या आईने अक्षय कुमार याच्यासमोर केला मोठा खुलासा, म्हणाली…
मुळात म्हणजे कोरोनानंतर बाॅलिवूडच्या खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. नुकताच रिलीज झालेला सेल्फी चित्रपट देखील काही खास कामगिरी अजूनही करू शकला नाहीये.
मुंबई : नुकताच अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर रिलीज झालाय. अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्यासोबत या चित्रपटामध्ये इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत आहे. विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी हे स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत. शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटाला रिलीज होऊन आता 31 दिवस जवळपास झाले असून शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. मात्र, रिलीजला इतके दिवस होऊनही पठाण चित्रपटाची धमाकेदार कामगिरी सुरू आहे. विशेष म्हणजे शाहरूख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला. शुक्रवारी अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, म्हणावा तसा या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाहीये. शहजादाला देखील धमाकेदार ओपनिंग करण्यात अपयश मिळाले असून अक्षय कुमार याच्या चित्रपटाने ओपनिंग डेला 3 कोटीचे कलेक्शन केले.
मुळात म्हणजे कोरोनानंतर बाॅलिवूडच्या खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. नुकताच रिलीज झालेला सेल्फी चित्रपट देखील काही खास कामगिरी अजूनही करू शकला नाहीये. विकेंडचा काय फायदा अक्षय कुमार याच्या चित्रपटाला होतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
नुकताच अक्षय कुमार हा सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी द कपिल शर्मा शोमध्ये पोहचला. यावेळी अक्षय कुमार याने धमाल केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी कपिल शर्माची आई जनक रानी देखील उपस्थित आहे. यावेळी अक्षय कुमार आणि कपिल शर्माची आई पंजाबीमध्ये बोलताना दिसत आहेत.
अक्षय कुमार हा कपिल शर्मा याच्या आईला विचारतो की, लहानपणी कपिल शर्मा खूप जास्त खोडकर असेल ना? यावर कपिल शर्मा याची आई म्हणते की, लहानपणी कपिल हा खूप जास्त शांत होता. यावर अक्षय कुमार म्हणतो की, जर तो खोडकर नसेल तर याचा अर्थ जगात कोणीही खोडकर नाही…
यावेळी कपिल शर्मा याची आई अक्षय कुमार याला कपिल शर्मा याने लहानपणी केलेल्या खोड्या सांगताना दिसत आहे. कपिल शर्मा याच्या आईचे बोलणे ऐकून अक्षय कुमार हा हासताना दिसत आहे. विशेष म्हणजे याचा प्रोमो स्वत: कपिल शर्मा याने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहे.