मुंबई : राखी सावंत ही बिग बाॅस (Bigg Boss) मराठीमधून बाहेर पडल्यापासून सतत चर्चेत आहे. बिग बाॅसच्या घराबाहेर येताच राखी सावंत हिने थेट सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. राखी सावंत हिने आपला प्रियकर आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर केले होते. विशेष म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सात महिन्यांपूर्वीच आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. हे लग्न राखी सावंत हिने तब्बल सात महिने सर्वांपासून लपून ठेवले होते. राखीचे लग्नाचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला. मात्र, यादरम्यानच आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबत झालेले लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही म्हणत मोठा धक्का दिला होता. मात्र, त्यानंतर सलमान खान याने आदिल दुर्रानी याला समजावून सांगितल्यानंतर आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबत लग्न मान्य केले. काही दिवसांपूर्वीच स्वत: राखी सावंत हिने सांगितले होते की, सलमान खान भाईमुळे माझे लग्न वाचले आहे.
राखी सावंत हिच्या आईचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. आईच्या निधनानंतर राखी सावंत हिने परत माझे लग्न धोक्यात असल्याचे सांगितले होते. आदिल दुर्रानी हा मला धोका देत असल्याचे म्हणत राखी पैपराजीसमोर रडताना दिसली.
या दरम्यान राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोपही लावले. आदिल दुर्रानी मला घटस्फोट दे म्हणत असल्याचे राखी सावंत म्हणाली होती. मात्र, आता परत राखी सावंत म्हणाली आहे की, आदिल दुर्रानी आणि माझ्या नात्यामध्ये आता सर्वकाही ठीक आहे.
मी बिग बाॅसच्या घरात असताना आदिल दुर्रानी हा त्याच्या एक्स प्रियसीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, आता आमच्यामधील काही गोष्टी स्पष्ट झाल्या असून माझा आदिल माझ्याजवळ परत आलाय.
इतकेच नाही तर राखी सावंत म्हणाली आहे की, मी आता माझा पती आदिल दुर्रानी याला बदनाम अजिबात करणार नाहीये. आमच्यामध्ये आता सर्वकाही ठीक आहे. राखी सावंत हिने लग्नानंतर आपले नाव बदलले आहे. आता राखी सावंत हिचे नाव फातिमा असे आहे.
राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नानंतर फक्त नावच बदलले नाही तर राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला आहे. आता राखी सावंत हिचे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे आहे.