अर्चना पूरन सिंह हिने थेट मागितले रोहित शेट्टी याच्याकडे काम, वाचा काय घडले?

| Updated on: Dec 14, 2022 | 3:32 PM

सर्कसची संपूर्ण टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

अर्चना पूरन सिंह हिने थेट मागितले रोहित शेट्टी याच्याकडे काम, वाचा काय घडले?
Follow us on

मुंबई : नुकताच सोशल मीडियावर ‘द कपिल शर्मा शो’चा एक नवा प्रोमो व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा आणि सर्कस चित्रपटाची टीम धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी रोहित शेट्टी देखील उपस्थित आहे. लवकरच रणवीर सिंहचा सर्कस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्कसची संपूर्ण टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. जवळपास सर्व शोमध्ये ही टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचत आहे. आता सर्कसची टीम द कपिल शर्मा शोमध्ये धमाका करण्यास तयार आहे.

द कपिल शर्माच्या शोमध्ये रोहित शेट्टी याला पाहून अर्चना पूरन सिंह म्हणते की, बोल बच्चन या चित्रपटानंतर तू मला तुझ्या कोणत्याच चित्रपटामध्ये घेतले नाही? यावर रोहित शेट्टी म्हणतो की, रणवीर सिंहच्या आईच्या रोलसाठी सर्वात अगोदर अर्चनाचाच विचार केला होता.

एवढ्यामध्ये कपिल शर्मा म्हणतो की, हिरोच्या आईसाठी नाहीतर हिरोईन म्हणून अर्चना म्हणत आहे. हे ऐकून सर्वजण जोरात हसायला लागतात. इतक्या रणवीर सिंह म्हणतो की, अर्चनाने माझेच कपडे घातले आहेत.

सर्कस चित्रपटाची टीम कपिल शर्माच्या शोमध्ये जोरदार धमाका करताना दिसणार आहे. चाहते आता या एपिसोडची आतुरतेने वाट पाहात आहेत. द कपिल शर्मा शोचा हा प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

अर्चना सिंह थेट रोहित शेट्टी याला काम मागताना देखील दिसत आहे. सध्या सर्कस चित्रपटाची संपूर्ण टीम ही चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. रोहित शेट्टी, रणवीर सिंह आणि सर्कस टीम बिग बाॅसच्या घरात देखील प्रमोशन करण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले जात आहे.