‘द कपिल शर्मा शो’ आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार शो…

द कपिल शर्मा शोमध्ये यंदा अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच जुने काही महत्वाचे चेहरे या सीजनमध्ये दिसणार नाहीयेत. सृष्टी रोडे, कॉमेडियन सिद्धार्थ सागर, गौरव दुबे, किकू शारदा आणि सुमोना चक्रवर्ती शोचा भाग असणार आहेत.

'द कपिल शर्मा शो' आजपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या कधी, कुठे पाहता येणार शो...
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 8:48 AM

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माचा शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) आता परत एकदा आपल्याला पोट धरून हसवण्यासाठी आलायं. दिवसभराचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी अनेकजण कपिल शर्माचा शो बघतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्माच्या (Kapil Sharma) शोने विश्रांती घेतली होती. आता परत नव्या जोमाने आज 10 सप्टेंबर 2022 पासून कपिल शर्माचा कॉमेडी शो दर शनिवार आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी टीव्हीवर प्रेक्षकांच्या (Audience) भेटीला आलायं. हा शो सोनी लिव्हवर लाईव्ह किंवा प्री-रेकॉर्डेड व्हर्जनमध्ये पाहता येणार असल्याने चाहत्यांमध्ये एक वेगळेच उत्साहाचे वातावरण बघायला मिळतंय.

द कपिल शर्मा शोमध्ये यंदा नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला

द कपिल शर्मा शोमध्ये यंदा अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तसेच जुने काही महत्वाचे चेहरे या सीझनमध्ये दिसणार नाहीयेत. सृष्टी रोडे, कॉमेडियन सिद्धार्थ सागर, गौरव दुबे, किकू शारदा आणि सुमोना चक्रवर्ती शोचा भाग असणार आहेत. नुकतेच कपिल शर्माने शोच्या नव्या लूकचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते, जे आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतायं. अर्चना सिंह आणि कपिल शर्मा नवीन सीझनमध्ये एकत्र पुनरागमन करत आहेत.

हे सुद्धा वाचा

कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर यांची शोला सोडचिठ्ठी

कपिल शर्मा शोमधील महत्वाचे चेहरे असलेले कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर यांना या शोमधून सध्यातरी डिच्चू दिल्याच्या बातम्या आहेत. मात्र, कृष्णा आणि चंदन यांनीच शोच्या बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची देखील चर्चा सुरूयं. सोनी टीव्हीने ‘द कपिल शर्मा शो’च्या आगामी भागाचा एक व्हिडीओ शेअर केलायं. या व्हिडीओमध्ये कपिल शर्मा कप्पू शर्माच्या भूमिकेत, कपिलची पत्नी बिंदूच्या भूमिकेत सुमोना चक्रवर्ती, मोहल्ला की धोबन गुडियाच्या भूमिकेत किकू शारदा दिसत आहेत.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.