Kapil Sharma | कपिल शर्मा शोमधील ‘तो’ सीन वादग्रस्त, निर्मात्यांविरोधात FIR दाखल, वाचा नेमकं काय घडलं…

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. परंतु आता ‘द कपिल शर्मा शो’चे निर्माते त्यांच्या एका कृत्यामुळे अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'द कपिल शर्मा शो'चा एक भाग पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात एफआयआर नोंदवण्यात आला.

Kapil Sharma | कपिल शर्मा शोमधील ‘तो’ सीन वादग्रस्त, निर्मात्यांविरोधात FIR दाखल, वाचा नेमकं काय घडलं...
Kapil Sharma show
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 2:04 PM

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परतला आहे. परंतु आता ‘द कपिल शर्मा शो’चे निर्माते त्यांच्या एका कृत्यामुळे अडचणीत सापडले आहेत. सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’चा एक भाग पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्हा न्यायालयात एफआयआर नोंदवण्यात आला. या तक्रारीत आरोप करण्यात आला होता की, एका एपिसोडमध्ये शोचे काही कलाकार स्टेजवर उघड्यावर मद्यपान करत असताना दाखवले आहेत. तर त्या बाटलीवर स्पष्ट लिहिले आहे की ‘दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे’.

तक्रारदार वकिलाने शिवपुरीच्या सीजेएम न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. वकील म्हणतात की सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘कपिल शर्मा शो’ खूपच ढिसाळ आहे. शोने स्टेजवर कोर्टाचा देखावा ठेवला होता आणि कलाकारांनी स्टेजवर सार्वजनिकरित्या मद्यपान केले. हा न्यायालयाचा अपमान आहे. म्हणून, मी कलम 356/3 अंतर्गत दोषींविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली.

मुलींवर देखील वाईट कमेंट!

इतकेच नाही तर, वकील म्हणतात की, या शोमध्ये मुलींवर देखील वाईट कमेंट केल्या जातात. वकील म्हणतात की, असे ढिसाळ प्रदर्शन थांबवणे आवश्यक आहे.

संपूर्ण प्रकरण काय आहे?

शिवपुरीच्या वकिलांनी केलेल्या तक्रारीमध्ये 24 जानेवारी 2021 रोजी प्रसारित झालेल्या 19 जानेवारीच्या भागाची पुनरावृत्तीची तक्रार केली आहे. वकिलाचे म्हणणे आहे की, शोमध्ये कोर्ट स्थापन करून शोचे एक पात्र मद्यपी म्हणून काम करताना दाखवले जाते. या प्रकरणाने न्यायालयाचा अवमान केला असल्याचे वकिलांनी सांगितले. अभिनेता कपिल ‘द कपिल शर्मा शो’ होस्ट करतो. त्यांच्याशिवाय सुमोना चक्रवर्ती, भारती सिंग, कृष्णा अभिषेक, सुदेश लाहिरी आणि अर्चना सिंह हे या शोमध्ये कॉमेडी शोचा भाग आहेत.

वकिलाची मागणी काय आहे?

शिवपुरीच्या वकिलाने एफआयआर दाखल केला आहे, त्यात म्हटले आहे की, 1 ऑक्टोबर रोजी न्यायालय या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. वकील म्हणाले की, ‘द कपिल शर्मा हा खूप घाणेरडा शो आहे. या शोमध्ये महिलांविषयी चुकीच्या टिप्पण्या केल्या जातात. एका एपिसोडमध्ये, कोर्टरूमची उभारणी स्टेजवर ठेवण्यात आली होती आणि कलाकार सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना दिसत आहेत. हा न्यायालयाचा अपमान आहे आणि याच कारणामुळे मी एफआयआर दाखल केला आहे. ही सगळी चूक वेळीच थांबली पाहिजे.’

तसे, आतापर्यंत कपिल शर्मा आणि शोच्या निर्मात्यांकडून या प्रकरणात कोणतेही विधान आले नाही. पण या प्रकरणाचा काय परिणाम होईल, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

बोस्टन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी चित्रपटाचा डंका, सलील कुलकर्णींच्या ‘एकदा काय झालं…’ला 3 नामांकन!

Disha Parmar : मालदीवमध्ये दिसला दिशा परमारचा हॉट अँड बोल्ड अवतार, बिकिनीमध्ये फोटो शेअर

Bigg Boss Marathi 3 | युवा कीर्तनकार शिवलीला पाटीलच्या ‘बिग बॉस’ एन्ट्रीने चाहते नाराज, सोशल मीडियावर कमेंट करत म्हणतायत…

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.