‘देवमाणूस’ मालिकेचा दुसरा सीझन येणार? पाहा निर्माती श्वेता शिंदे काय म्हणाली…

मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याच दरम्यान या मालिकेची निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

‘देवमाणूस’ मालिकेचा दुसरा सीझन येणार? पाहा निर्माती श्वेता शिंदे काय म्हणाली...
Shweta Shinde
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 10:49 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ने (Devmanus) नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मालिकेच्या एका क्लायमॅक्स प्रोमोमध्ये डॉक्टरला अर्थात देवीसिंग फाशी दिल्याचे दिसले होते. ‘देवमाणूस’ या मालिकेचा दोन तासांचा शेवटचा आणि विशेष भाग काल (15 ऑगस्ट) रोजी प्रदर्शित झाला. मात्र, यात असे काहीही दाखवले गेले नाही. उलट शेवट दाखवलेल्या कथानकामुळे आता या मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार, असे म्हटले जात आहे.

मालिका सध्या ऑफ एअर गेली आहे. मालिकेत प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. मात्र, या मालिकेचा दुसरा सीझन येणार का? आणि आला तर कधी येणार?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. याच दरम्यान या मालिकेची निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

काय म्हणाली श्वेता शिंदे?

‘16 ऑगस्ट 2020 ला ऐन पॅनडामिकमध्ये वज्र प्रोडक्शन्स निर्मित ‘देवमाणूस’ या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पाहता-पाहता एक वर्ष सरलं… गेले एक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेचा काल शेवटचा भाग प्रदर्शित झाला. रात्री 10.30च्या स्लॉटला असून सुद्धा सर्व मराठी मालिकांमध्ये नंबर वन राहण्याचा इतिहास या मालिकेने रचला ते केवळ मालिकेवर असीम प्रेम करणाऱ्या आपल्या सारख्या रसिक प्रेक्षकांमुळे. यासाठी आपले सर्वांचे शतशः आभार.’

टीमचं केलं कौतुक!

‘लागिर झालं जी’ मधील भैय्यासाहेब असो वा ‘देवमाणूस’ मधील देवीसिंग उर्फ अजित कुमार देव किरण तू नेहमीच माझ्या विश्वासाला पात्र ठरत प्रत्येक भूमिका अगदी उत्तम सकरलीस. सरू आजी आणि टोन्या मुळे तर जणू memes ची बरसातच झाली. इतकेच नव्हे डिंपल व तिचे आई-बाबा, वंदी आत्या, लाला, बज्या, नाम्या, दीपा, विजय, रेश्मा, अपर्णा, मंजुळा, दिव्या सिंग, आर्या देशमुख आणि आता नव्याने आलेली कोल्हापुरी मिरची म्हणजेच चंदा सर्वांनीच शेरास सव्वाशेर अशा भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विशेष म्हणजे इतकी पात्र मालिकेत येत-जात असूनही प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आपली एक वेगळी छाप उमटवत होत. सर्वच कलाकारांच्या दमदार अभिनयाला साथ मिळाली ती दिग्दर्शक राजू सावंत यांच्या दिग्दर्शनाची व स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम यांच्या लेखणीची. यांच्यामुळे अगदी सध्या ‘Beautiful’ शब्दापासून ते सरू आजीच्या गोड बोलीपर्यंत एकूण-एक डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीचा भाग ठरले. तसेच वज्र प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम आणि तंत्रज्ञ यांच्या अढळ पाठिंब्यामुळेच ‘देवमाणूस’ मालिकेचा हा इतका लांबचा पल्ला गाठणं शक्य झालं, असं देखील ती म्हणाली.

नवीन काहीतरी घेऊन येऊ…

‘आपल्या सर्वांची लाडकी मालिका “देवमाणूस “आज आपला निरोप घेते आहे. झी मराठी वाहिनीनी ही संधी आम्हास दिली त्यासाठी आम्ही त्यांचे नेहमीच ऋणी राहू. लवकरच आणखीन काहीतरी खास घेऊन तुमच्या मनोरंजनास सज्ज असू, पण तोपर्यंत तुमचं असच प्रेम आमच्या पाठीशी राहुद्या, हीच नम्र विनंती’, असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. यातून तिने नवं काही तरी घेऊन येऊ, असा संकेत दिला आहे.

पाहा पोस्ट :

हेही वाचा :

नव्या मालिका आणि नव्या जोड्या… पाहा कोणकोणत्या कलाकारांची नवी जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

राज कुंद्राच्या अटकेनंतर प्रथमच शिल्पा शेट्टीचे सोशल मीडियावर दर्शन, नकारात्मकतेबद्दल दिला ‘हा’ संदेश!

देवमाणसाचा अंत नाहीच? अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेलेला ‘देवमाणूस’ पुन्हा परतणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.