टीव्ही इंडस्ट्रीतील या अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक, कुटुंबाकडे उपचारासाठी पैसे नाही…
सेटवर शूटिंग करत असताना अनाया सोनीला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर अनायाला थेट मुंबईतील एका रूग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई : टीव्हीवरील फेमस मालिका ‘मेरे साई’ यामध्ये महत्वाची भूमिका करणारी अभिनेत्री अर्थात अनाया सोनी (Ananya Soni) हिच्याबद्दल एका वाईट बातमी पुढे येतंय. सेटवर शूटिंग करत असताना अनाया सोनीला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर अनायाला थेट मुंबईतील (Mumbai) एका रूग्णालयात दाखल करण्यात आले. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार अनायाची तब्येत खराब असून तिची किडनी खराब झाल्याची माहिती मिळतंय. अनायाकडे पुढील उपचारासाठी पैसे (Money) देखील नसल्याचे तिच्या वडिलांनी सांगितय.
इथे वाचा अनाया सोनीने शेअर केलेली पोस्ट
अनाया सोनीच्या वडिलांनी सांगितले की, अनायाची एक किडनी खराब आहे, पुढील उपचारासाठी आमच्याकडे पैसे नसून कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आमच्याकडे अनायाच्या उपचारासाठी पैसे नाहीत. किडनी बदलण्यासाठी आणि डायलिसिससाठी पैसे नसल्याने अनायाचे वडील चिंतेत आहेत. पुढील उपचारासाठी पैसे कुठून आणावे ही समस्या अनायाच्या वडिलांसमोर उभी आहे.
अनाया सोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. अनायाने तिच्या तब्येतीची माहिती तिच्या चाहत्यांना दिलीये. अनाया सोनीला चक्कर येऊन सेटवर पडली. ही बातमी तिच्या चाहत्यांपर्यंत पोहचल्याने चाहते चिंतेत होते. मात्र, अनायाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तब्येतीची माहिती दिलीये. अनायाने पोस्टमध्ये लिहिले की, माझी किडनी खराब झालीये, डाॅक्टरांनी डायलिसिस करण्याचा सल्ला दिलाय. कारण माझे हिमोग्लोबिन 6.7वर गेले आहे. माझ्यासाठी सर्वांनी देवाकडे प्रार्थना करा.