Bigg Boss 16 : ‘बिग बॉस 16’ च्या घरात ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सहभागी होणार, पाहा प्रोमो…
बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, बिग बॉसमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे कळू शकले नाहीये.
मुंबई : बहुप्रतिक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस लवकरच चाहत्यांच्या भेटीला येतोय. बिग बॉस (Bigg Boss) में आपका स्वागत है…हे शब्द ऐकण्यासाठी चाहत्यांचे कान आता आतुर झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षक बिग बॉस 16 ची वाट पाहात होते. शेवटी ती आनंदीची वेळ आलीये आणि बिग बॉस 16 (Bigg Boss 16) 1 आॅक्टोबरपासून सर्वांच्या भेटीला येत आहे. चाहत्यांमध्ये (fans) बिग बॉस 16 बद्दल प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे. शोमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार, यंदा बिग बॉसच्या घराची थीम काय असणार हे सर्व काही जाणून घेण्यासाठी चाहते इच्छुक आहेत.
इथे पाहा बिग बाॅसचा प्रोमो…
Shero ke sher, Bigg Boss utrenge iss maidaan mein khelne yeh khel ?
Dekhiye #BiggBoss16, 1st October se, raat 9.30 baje, sirf Colors par! #BB16 #BiggBoss@BeingSalmanKhan@Chingssecret @MyGlamm pic.twitter.com/OS2jg4KwgB
— ColorsTV (@ColorsTV) September 27, 2022
सोशल मीडियावर बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, बिग बॉसमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत, हे कळू शकले नाहीये. अनेक टीव्ही अभिनेत्रींच्या नावाची चर्चा सुरूयं.
नुकताच सोशल मीडियावर बिग बॉस 16 चा एक प्रोमो शेअर करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये आपल्या सर्वांची लाडकी इमली दिसत आहे. इमली एका घरात बसल्याचे प्रोमोमध्ये दिसत असून समोर एक टीव्ही दिसत आहे. बिग बॉसचा आवाज ऐकू येत आहे.
या प्रोमोमध्ये मालिकेमधील इमली आणि रिअल लाईफमधील सुंबुल तौकीर दिसत आहे. यामध्ये ती ‘इमली का बूटा बेरी का पेड’ हे गाणे म्हणताना दिसत आहे. यावेळी इमली शेवटी म्हणते की, इस सीजन के हम दो शेर…
त्यावर टीव्हीमधून बिग बाॅसचा आवाज येतो की, तू शेर आहेस तर मी सव्वाशेर…आता हे जवळपास स्पष्ट झाले आहे की, इमली अर्थात सुंबुल तौकीर बिग बॉस 16 मध्ये दिसणार आहे. बिग बॉस 16 मधील सुंबुल तौकीर ही सर्वात वयाने लहान स्पर्धक असणार आहे.