‘ती परत आलीये’मध्ये ‘कुणी तरी येणार येणार गं!’, पाहा कशा प्रकारे चित्रित झालं डोहाळे जेवणाचं गाणं…
झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘ती परत आलीये’ ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय.
मुंबई : झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘ती परत आलीये’ ही मालिका चांगलीच रंगत चालली आहे. या मालिकेने अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेत रोहिणीची व्यक्तिरेखा ही गरोदर दाखवण्यात आहे. रिसॉर्टवर अडकल्यापासून या सर्व मित्र मैत्रिणींच्या आयुष्यात खूप काही घडतंय. त्यात रोहिणी गरोदर असल्यामुळे तिची काळजी सगळ्यांनाच आहे. त्यामुळे तिचं डोहाळे जेवण करण्याचं सर्वजण ठरवतात.
डोहाळे जेवण हा कार्यक्रम लोकप्रिय मराठी चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ मधील ‘कोणी तरी येणार येणार गं’ या गाण्याशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे मालिकेत देखील वातावरणातील गंभीरता कमी करण्यासाठी अगदी उत्साहात रोहिणीचं डोहाळे जेवण साजरी करण्यात येणार आहे आणि त्यात हे गाणं देखील असणार आहे. या गाण्यावर हणम्या म्हणजे अभिनेता समीर खांडेकर आणि टिक्या म्हणजेच अभिनेता प्रथमेश हे दोघे थिरकताना दिसतील.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान सर्व कलाकारांनी धमाल केली आणि या गाण्याच्या शूटींगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेटिझन्सना देखील सर्व कलाकारांची शूटिंग दरम्यान चालली मजा मस्ती पाहून धमाल येतेय. ती परत आलीये मालिकेत आलेले हे आनंदाचे क्षण किती वेळ टिकतील? या आनंदावर विरजण पाडण्यासाठी ‘ती’ काही अघटित घडवून आणणार का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.
विजय कदम यांचे पुनरागमन!
जेष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत एका वेगळ्या आणि लक्षवेधी भूमिकेत दिसत आहेत. अभिनेते विजय कदम यांनी बऱ्याच कालावधी नंतर टीव्हीवर पुनरागमन केले आहे. प्रोमोमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं होतं की, विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना, ते दिसत आहेत. नक्की ही भानगड काय आहे? ही माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.
ती कोण आहे, याबद्दल बोलताना विजय कदम म्हणाले, “तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. ती कोण आहे, हे मला माहिती नाही.. पण तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे. त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे, हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल.”
हेही वाचा :
Anagha Atul: उफ्फ ये अदा… भगरे गुरुजींच्या लेकीचा बोल्ड लूक, पाहा अनघा अतुलचे क्लासी फोटो
अभय देओल पुन्हा प्रेमात? सोशल मीडियावर शेअर केले रोमँटिक फोटो, पाहा कोण आहे ही खास व्यक्ती…