शिवानीने सुबोधला काय गिफ्ट दिले? सोनी टीव्हीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेपूर्वी शिवानीने उलगडले रहस्य

subodh bhave shivani sonar: सोनी मराठीवर वाहिनीवर 'तू भेटशी नव्याने’ ही मालिका येत्या ८ जुलै पासून येत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार हे प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेमधील शिवानीने सुबोध याला गिफ्ट दिल्याची पोस्ट व्हायरल झाली होती.

शिवानीने सुबोधला काय गिफ्ट दिले? सोनी टीव्हीवरील 'तू भेटशी नव्याने’ मालिकेपूर्वी शिवानीने उलगडले रहस्य
subodh bhave shivani sonar
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 2:27 PM

छोट्या पडद्यावरील मनोरंजन विश्वासात सध्या एका वेगळ्या मालिकेची चर्चा आहे. मालिका विश्वात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचा (एआय) वापर करण्यात आला आहे. सोनी मराठीवर वाहिनीवर ‘तू भेटशी नव्याने’ ही मालिका येत्या ८ जुलै पासून येत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार हे प्रमुख भूमिकेत आहे. या मालिकेमधील शिवानीने सुबोध याला गिफ्ट दिल्याची पोस्ट व्हायरल झाली होती. त्यानंतर त्या गिफ्टमध्ये काय होते? त्याचा खुलासा शिवानीने केला. ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या पत्रकार परिषदेत शिवानीने प्रथमच ते गिफ्ट काय होते, ते सांगितले. या पत्रकार परिषदेला सुबोध भावे, शिवानी सोनार यांच्यासह सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भालवनकर उपस्थित होते.

काय म्हणाली शिवानी

सुबोध भावेसोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर शिवानी हिची खूप चर्चा होती. त्यामुळे शिवानीच्या मित्रांमध्ये सुबोधसंदर्भात चर्चा सुरु झाली. शिवानीने सुबोधला गिफ्ट द्यावे, असा सूर सर्वांचा निघाला. परंतु हे गिफ्ट काय द्यावे, हा प्रश्न सर्वांना होता. प्रत्येक मित्राने कोणते गिफ्ट द्यावे, ते सांगितले. मग त्यातून आयडिया मिळाली. सुबोध आणि शिवानी यांची ही मालिका एआयवर आहे. त्यात २५ वर्षांपूर्वीचा सुबोध दिसणार आहे. यामुळे सुबोधने आतापर्यंत केलेल्या कामासंदर्भातील गिफ्ट द्यावे, असे ठरले. मग सुबोधने केलेल्या कामाचे फोटो आणि पोस्टर मिळवणे सुरु केले. त्याचा छान संग्रह सुबोधला शिवानीने दिला.

सुबोधकडून काय प्रतिक्रिया मिळाली

शिवानी हिने दिलेल्या गिफ्टबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला, शिवानी याने दिलेले गिफ्ट खूप अनोखे होते. तिने त्या मागे खूप कष्ट घेतलेले दिसत आहेत. दोन कलाकारांमधील नाते असेच असले पाहिजे. ते या गिफ्टमधून दिसले. मालिकेसंदर्भात बोलताना सुबोध म्हणाला, ही मालिका एआयवर आधारित असलेली जगभरातली पहिलीच मालिका आहे. तिच्यात डबल रोलची भूमिका करताना मला काही अवघड गेले नाही. २५ वर्षांपूर्वीचा सुबोध एआयने साकारला. आवाजातील थोडा फार बदल एआयमधून झाला. नाहीतर मला २५ वर्षांपूर्वीचा सुबोध साकरताना खूप मेहनत घ्यावी लागली असती. वजन कमी करावे लागले असते. परंतु एआयने सर्व काम सोपे केले.

हे सुद्धा वाचा

मालिकेसाठी वर्षभरापासून मेहनत

सोनी मराठीवरील ही मालिका येत्या ८ जुलैपासून रोज रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. यासंदर्भात बोलताना सोनीचे बिझनेस हेड अजय भालवनकर म्हणाले, मालिकांमध्ये तोच तोच पण देण्यापेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. आमचा एआयवर सेमिनार झाला होता. त्या सेमिनारमधून ही कल्पना समोर आली. त्यासाठी सोनीच्या टेकनिकल टीमने गेल्या वर्षभरापासून खूप मेहनत घेतली.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.