Video: राणादाच्या भावाची नवी प्रेमकहाणी; ‘या’ मालिकेतून राज हंचनाळेचं कमबॅक

या प्रोमोवरून हे लक्षात येतंय की या मराठी मालिकेत साऊथचा तडका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. कारण अभिनेत्री त्याच्याशी दाक्षिणात्य भाषेत बोलताना पहायला मिळतेय आणि तिचा पेहरावसुद्धा तसाच आहे.

Video: राणादाच्या भावाची नवी प्रेमकहाणी; 'या' मालिकेतून राज हंचनाळेचं कमबॅक
Raj HanchanaleImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:35 AM

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangla) या लोकप्रिय मालिकेत राणादाच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळे (Raj Hanchanale) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या मालिकेत राज मुख्य भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर (Pratiksha Shiwankar) मुख्य भूमिकेत दिसणार असून तिची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. राजने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा प्रोमो शेअर केला आहे.

‘घेऊन येतोय नवीन प्रेम कहाणी.. लवकरच’, असं कॅप्शन या प्रोमोला दिलं आहे. या प्रोमोमध्ये राज नदीकिनारी असताना त्याला एक तरुणी भेटायला येते. या दोघांमध्ये प्रेमळ संवाद ऐकायला मिळतो. या प्रोमोवरून हे लक्षात येतंय की या मराठी मालिकेत साऊथचा तडका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. कारण अभिनेत्री त्याच्याशी दाक्षिणात्य भाषेत बोलताना पहायला मिळतेय आणि तिचा पेहरावसुद्धा तसाच आहे. प्रतीक्षाने याआधी कॉलेज डायरी, कॉमेडी बिमेडी, एका लग्नाची पुढची गोष्ट अशा प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. मात्र ही तिची पहिलीच मालिका आहे.

हे सुद्धा वाचा

पहा मालिकेचा प्रोमो-

राजने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलंय. त्याने साकारलेल्या भूमिकासुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. तर दुसरीकडे प्रतीक्षा ही कॉमेडियन, मॉडेल आणि अभिनेत्री आहे. प्रतीक्षाने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मध्ये प्रशांत दामलेंसोबत काम केलंय. ती गडचिरोली इथली असून नृत्य आणि अभिनयात तिला विशेष रस आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.