Tunisha Sharma Suicide Case | तुनिशा शर्मा आणि शीजान खान यांना करायचे होते एकमेकांसोबत लग्न
शीजान खान याची फक्त सीक्रेट गर्लफ्रेंडच नव्हती तर तो अनेक मुलींच्या संपर्कात देखील होता.

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबरला अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येच्या तीन दिवसांनंतर तुनिशाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईमध्ये करण्यात आले. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीजान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये असून पोलिस त्याची चाैकशी करत आहेत. शीजान खान याची एक सीक्रेट गर्लफ्रेंड देखील होती. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिस तिची देखील चाैकशी करणार आहेत.
शीजान खान याची फक्त सीक्रेट गर्लफ्रेंडच नव्हती तर तो अनेक मुलींच्या संपर्कात देखील होता. आत्महत्येच्या 15 दिवस अगोदरच शीजान आणि तुनिशा यांचे ब्रेकअप झाले होते आणि यामुळेच तुनिशा ही तणावामध्ये होती.
तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे लग्न करणार होते, असे तुनिश शर्मा हिच्या फॅमिलीच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे. इतकेच नाहीतर याला दोन्ही फॅमिलींचा होकार देखील होता.
बऱ्याच वेळा शीजान खान हा तुनिशाच्या घरी येऊन राहत होता. पाच ते सहा दिवस तो तुनिशाच्या घरी राहायचा. इतकेच नाहीतर तुनिशा ही सेटवर जाताना शीजान खान याच्यासाठी जेवणही घेऊन जात होती.
तुनिशा हिची आई देखील शीजानच्या घरी जायची. अनेकदा तुनिशा ही शीजानच्या घरी राहत होती. तुनिशाच्या आईला देखील शीजान आणि तुनिशा यांच्या रिलेशनवर आणि त्यांच्या लग्नावर काहीच आक्षेप नव्हता.
आणि शीजान यांचे लग्नाचे प्लानिंग असताना असे नेमके काय घडले की, या दोघांनी अचानकपणे ब्रेकअप केले याचा शोध पोलिस घेत आहेत. कारण तुनिशा ही शीजान खान याच्या बहिणींची देखील चांगली मैत्रीण होती.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आता अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये शीजान खानही दिसणार नाहीये. मालिकेच्या निर्मात्यांनी आता यावर मोठा निर्णय घेतला आहे.