Tunisha Sharma Case | शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव, तुनिशा शर्मा प्रकरणात मिळणार दिलासा?
शीजान खान हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या कुटुंबियांवरही अनेक गंभीर आरोप तुनिशाच्या आईने केली.
मुंबई : बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात करणारी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: मालिकेतील तुनिशा शर्मा हिच्यासोबतच मुख्य भूमिकेत असलेला शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाहीतर FIR नोंद झाल्यानंतर शीजान खान याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी न्यायालयात शीजान खान याला हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. आता सध्या शीजान खान हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या कुटुंबियांवरही अनेक गंभीर आरोप तुनिशाच्या आईने केली.
तुनिशा शर्मा हिने २४ डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाने आत्महत्या केल्यापासून शीजान खान हा जेलमध्येच आहे. न्यायालयाने काही दिवसांपूर्वी शीजान खान याचा जामीन अर्ज नाकारला होता.
नुकताच शीजान खान याने जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आता यावर ३० जानेवारीला सुनावणी केली जाणार आहे. ३० तारखेला हे स्पष्ट होईल की, शीजान खान याला मुंबई उच्च न्यायालयात दिलासा मिळतो की नाही.
काही दिवसांपूर्वीच शीजान खान याने FIR रद्द करण्यासाठी देखील एक याचिका दाखल केली होती. तुनिशा शर्मा हिच्या वकिलाने शीजान खान याच्यासोबतच त्याच्या कुटुंबावर देखील काही गंभीर आरोप केले आहेत.
तुनिशा शर्मा हिला काही आैषधे शीजान खान याच्या घरचे देत असल्याचे वकिलाने म्हटले होते. इतकेच नाहीतर तुनिशा शर्मा हिच्या मामाने देखील काही आरोप केले आहेत.
तुनिशा शर्मा हिच्या आईने सांगितले की, माझ्या मुलीला शीजान खान याच्या कुटुंबियांनी माझ्यापासून दूर केले होते. शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानेच तुनिशा शर्मा ही तणावात होती आणि तिने आत्महत्या केली.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान ए काबुल मालिका काही दिवसांसाठी बंद होईल, असे सांगितले जात होते. परंतू निर्मात्यांनी मोठी निर्णय घेत परत एकदा नव्या जोमाने मालिकेच्या शूटिंगला सुरूवात केलीये.
आता तुनिशा शर्मा हिच्याप्रमाणेच शीजान खान हा देखील यानंतर मालिकेमध्ये दिसणार नाहीये. शीजान खान याला तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.