Tunisha Sharma Death Case | शीजान खान याचा कोठडीमधील मुक्काम वाढला, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात दिलासा नाहीच
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 24 डिसेंबरपासून शीजान खान हा कोठडीमध्ये आहे. सुरूवातीला तो पोलिस कोठडीमध्ये होता.
मुंबई : तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. आत्महत्येच्या १५ दिवस अगोदर तुनिशा शर्मा आणि शीजान खान यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. शीजान खान आणि तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हे दोघेही अली बाबा: दास्तान ए काबुल या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. ब्रेकअप झाल्यामुळे तुनिशा ही तणावामध्ये होती आणि यामध्येच तिने आत्महत्या केल्याचे सांगितले जातंय. तुनिशा शर्मा हिने शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्याच्या अगोदर काही मिनिटे ती शीजान खान यालाच भेटली होती. यामुळे शेवटच्या त्या पंधरा मिनिटांमध्ये शीजान आणि तुनिशामध्ये असे काय घडले की, थेट तिने आत्महत्या केली याचा शोध पोलिस घेत आहेत.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. 24 डिसेंबरपासून शीजान खान हा कोठडीमध्ये आहे. सुरूवातीला तो पोलिस कोठडीमध्ये होता. सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
आता शीजान खान याच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. आजही शीजान खान याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाहीये. न्यायालयाने शीजान खान याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
शीजान खान याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यामुळे अजून काही दिवस कोठडीमधील मुक्काम शीजानचा वाढला आहे. तुनिशा शर्मा हिच्या वकिलाने काही दिवसांपूर्वी शीजान खान याच्यासह त्याच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले आहेत.
तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिस शीजान खान याची चाैकशी करत आहे. शीजान खान याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, वसई न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला आहे.
शीजान खान याला जामीन मिळाल्यावर याचा फटका या प्रकरणाला बसू शकतो, अस न्यायालयाने म्हटले आहे. शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशा तणावात होती, असे सांगितले जातंय.
तुनिशा शर्मा हिने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर २४ डिसेंबरला गळफास घेतला. तुनिशा आणि शीजान खान रिलेशनशिपमध्ये होते. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजानच्या कुटुंबियांनी देखील काही आरोप केले आहेत.