तुनिशा शर्माच्या या जवळच्या व्यक्तीची तब्बल तीन तास चाैकशी, शीजान खान याच्यावर पोलिसांना संशय
पोलिस याप्रकरणात तुनिशाच्या आईपासून ते शीजान खान याच्या कुटुंबियांपर्यंत सर्वांची चाैकशी करताना दिसत आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुनिशाच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. शीजान खान हा पोलिस कोठडीमध्ये असून पोलिस त्याची चाैकशी करत आहेत. एक महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. पोलिस याप्रकरणात तुनिशाच्या आईपासून ते शीजान खान याच्या कुटुंबियांपर्यंत सर्वांची चाैकशी करताना दिसत आहेत.
पोलिसांना शीजान खान याने दिलेल्या जबाबवर विश्वास नाहीये. कारण तो सतत त्याचे जवाब बदलताना दिसत आहे. सुरूवातीला तर शीजान खान याने पोलिसांना उडवा उडवीचे उत्तरे दिल्याचे सांगितले जात आहे.
आता पोलिसांना महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. परंतू यावर पोलिसांनी शीजान खान याला प्रश्न विचारले असताना तो जबाब बदलत आहे. कारण शीजान खान याने शेवटी तुनिशाला असे काही बोलले की, तिने थेट आत्महत्या केली.
आता या प्रकरणात पोलिसांनी तुनिशा शर्मा हिचा बेस्ट फ्रेंड कंवर ढिल्लन याची चाैकशी केली आहे. विशेष बाब म्हणजे पोलिसांनी कंवर ढिल्लनची तब्बल तीन तास चाैकशी केली आहे.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर कंवर ढिल्लन याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याने लिहिले होते, शेवटी मला एक काॅल करायचा होता यार…मी तुझ्यावर खूप नाराज आहे. कंवर ढिल्लन आणि तुनिशा शर्मा यांनी एका शोमध्ये सोबत काम केले होते.