Tunisha Sharma Suicide Case | संजीव कौशल यांनी दिले शीजान खान याच्या बहिणींच्या आरोपावर उत्तर, म्हणाले काही नाते…
तुनिशाच्या आईनंतर शीजान खान याच्या बहिणींनी देखील एक पत्रकार परिषद घेत तुनिशा शर्माच्या आईवर अनेक आरोप केले.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. तुनिशा हिने 24 डिसेंबरला अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने याच मालिकेमध्ये तुनिशासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आता शीजान खान हा कोठडीमध्ये आहे. तुनिशाच्या आईनंतर शीजान खान याच्या बहिणींनी देखील एक पत्रकार परिषद घेत तुनिशा शर्माच्या आईवर अनेक आरोप केले.
शीजान खान याच्या बहिणींने या पत्रकार परिषदेमध्ये तुनिशाच्या आईवर असे काही आरोप केले की, मोठी खळबळ निर्माण झालीये. तुनिशा शर्मा हिचे मामा असल्याचा दावा करणारे संजीव कौशल यांच्यावरही शीजान खान याच्या बहिणींने काही आरोप केले.
शीजान खान याच्या बहिणींचे म्हणणे आहे की, संजीव कौशल हे तुनिशा शर्माचे मामा नसून त्याचा काहीच संबंध नाहीये. तुनिशाची आई वनिता शर्मा आणि संजीव कौशल यांचे काय रिलेशन आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा.
तुनिशा शर्मा हिच्या आईने जे काही आरोप शीजान खान याच्यावर केले होते. ते सर्व खोटे असल्याचा देखील दावा शीजान खान याच्या कुटुंबियांनी केला आहे. तुनिशा आणि तिच्या आईमध्ये कशाप्रकारचे रिलेशन होते हे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
आता संजीव कौशलने शीजान खान याच्या बहिणींनी लावलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे. संजीव कौशल म्हणाले की, तुनिशा ही माझ्या मुलीसारखी होती. माझ्या मुलीचा आणि तुनिशाचा वाढदिवसही आम्हीसोबत साजरा केला होता.
माझे जरी तुनिशासोबत रक्ताचे नाते नसले तरीही मी साधारण बारा वर्षांपासून या कुटुंबाला ओळखतो. माझी मुलगी ऋतिका आणि तुनिशासोबत राहायच्या. काही नाती काचेसारखी स्पष्ट असतात. अशी नाती सगळीकडेच असतात.