तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येच्या दिवशी तब्बल इतके तास शीजान खान आणि त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडमध्ये चॅट, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा?

तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या फक्त 15 दिवस अगोदरच तुनिशा आणि शीजान खान यांचे ब्रेकअप झाले होते.

तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येच्या दिवशी तब्बल इतके तास शीजान खान आणि त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडमध्ये चॅट, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा?
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 5:01 PM

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमध्ये तुनिशासोबतच मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. FIR दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करत न्यायालयामध्ये हजर केले. शीजान खान हा 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीमध्ये होता. आता शीजान हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. तुनिशा शर्मा हिच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान खान याच्या कुटुंबियांनीही अनेक आरोप केले.

तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या फक्त 15 दिवस अगोदरच तुनिशा आणि शीजान खान यांचे ब्रेकअप झाले होते. यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे.

शीजान खान याची एक सीक्रेट गर्लफ्रेंड असल्याचे सुरूवातीपासून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पोलिसांनी तिची चाैकशी देखील केली आहे. नुकताच एक मोठा खुलासा झालाय.

तुनिशा शर्मा हिने ज्यादिवशी आत्महत्या केली. त्याचदिवशी शीजान खान हा त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडला मेसेजवर तब्बल एक तासांपेक्षाही अधिक काळ बोलत होता. तुनिशाच्या आत्महत्येनंतर त्याने हे सर्व मेसेज डिलीट केले होते.

विशेष गोष्ट म्हणजे फक्त शीजान खान हाच नाहीतर त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडने देखील तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजान खान आणि तिच्यामध्ये झालेली सर्व चॅट डिलीट केली.

आता पोलिसांनी शीजान खान आणि त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडमध्ये आलेली चॅट रिकव्हर केली असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आता नेमके काय खुलासे होतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

शीजान खान याच्या कुटुंबियांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे तुनिशा शर्मा हिच्या आईने म्हटले आहे. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मालिकेच्या शूटिंगला परत एकदा सुरूवात करण्यात आलीये.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.