तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खानवर केला ड्रग्स घेण्याचा गंभीर आरोप
इतकेच नाहीतर तिने एका चित्रपटामध्ये देखील भूमिका केली होती.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 20 व्या वर्षी तुनिशा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. तुनिशा हिने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरूवात केली. इतकेच नाहीतर तिने एका चित्रपटामध्ये देखील भूमिका केली होती. बालकलाकार म्हणून करिअरची सुरूवात केल्यानंतर तुनिशा हिच्याकडे सतत काम होते आणि अनेक मालिकांमध्ये ती महत्वाच्या भूमिकेत होती. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही तिची जबरदस्त फॅन फाॅलोइंग होती.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आरोपांचे सत्र सुरू झाले. तुनिशा शर्माच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करत आपल्या मुलीच्या आत्महत्येस हाच कारणीभूत असल्याचे म्हटले. त्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक करून न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.
आता प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना सतत दिसत आहे. नुकताच तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केल्याचे देखील त्यांनी म्हटले असून माझी मुलगी यांच्यामुळेच माझ्यापासून दूर गेल्याचे सांगितले.
तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर अजून एक गंभीर आरोप केला असून त्यांनी म्हटले की, शीजान खान हा ड्रग्स घेत होता. अनेकदा तुनिशा हिने शीजान खान याला ड्रग्स घेण्यास मनाई केली असताना तो तिला भांडत होता आणि त्यांच्यामध्ये वाद व्हायचा.
तुनिशा ही शीजानवर प्रेम करत असल्यामुळे तिने त्याच्या ड्रग्स घेण्याकडे दुर्लक्ष केले, असल्याचे देखील तुनिशाच्या आईने म्हटले. शीजान खान हा तुनिशाला उर्दू शिकवत असल्याचे तिच्या आईने सांगितले आहे. शीजान खान याच्यामुळेच माझ्या मुलीने आत्महत्या केली असून त्याला शिक्षा झालीचे पाहिजे, असेही तुनिशा शर्माच्या आईने म्हटले आहे.