तुनिशा शर्मा हिच्या आईचा संताप, थेट पाठवली चॅनलला कायदेशीर नोटीस, शीजान खान याच्या अडचणी कमी होईना
टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर मालिकेच्या सेटवर काही दिवस भितीचे वातावरण हे बघायला मिळाले. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने अलीबाबा मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अलीबाबा मालिकेत तुनिशा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान (Sheezan Khan) याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर आरोप केल्यानंतर पोलिसांनी शीजान खान याला अटक केली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्या अडचणीमध्ये सतत वाढ होताना दिसली. इतकेच नाही तर त्याला तुनिशाच्या आत्महत्ये प्रकरणात जवळपास तीन महिने जेलमध्ये राहण्याची वेळ आली. काही दिवसांपूर्वीच शीजान खान याला कोर्टाकडून (Court) दिलासा मिळालाय.
कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शीजान खान या जेलच्या बाहेर आलाय. शीजान खान हा जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याची आई ढसाढसा रडताना दिसली होती. यावेळी त्याच्या बहिणी देखील होत्या. शीजान खान हा जेलमधून बाहेर आल्यापासून सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी त्याने तुनिशा शर्मा हिच्या आठवणीमध्ये सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती.
जेलमधून बाहेर आल्यानंतर शीजान खान याचे नशीब उजळले आहे. शीजान खान याला थेट रोहित शेट्टी यांच्या खतरो के खिलाडी 13 ची आॅफर मिळालीये. विशेष म्हणजे शीजान खान याने देखील रोहित शेट्टी याच्या शोला होकार दिलाय. विदेशात जाण्यासाठी शीजान खान याने कोर्टाकडे परवानगी देखील मागितली होती. इतकेच नाही तर शीजान खान याला कोर्टाकडून विदेशात जाण्याची परवानगी देखील मिळालीये.
शीजान खान याला विदेशात जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर तुनिशा शर्मा हिच्या आईने संताप व्यक्त केलाय. या प्रकरणात तुनिशा शर्मा हिच्या आईने चॅनलला नोटीस पाठवलीये. यामुळे आता चॅनलवाल्यांना या शोमध्ये शीजान खान याला घेताना दहा वेळा विचार हा करावा लागणार आहे. यामुळे शीजान खान हा खतरो के खिलाडीमध्ये सहभागी होणार की नाही यावर मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय.
तुनिशा शर्मा हिच्या आईचे म्हणणे आहे की, आपल्या मुलीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी, जो नुकताच जामिनावर जेलमधून बाहेर आला आहे. त्याला चॅनल इतक्या जास्त लोकप्रिय आणि मोठ्या शोमध्ये कसे सहभागी होऊ देऊ शकते?. तुनिषा शर्मा हिचे काका पवन शर्मा यांनीही म्हटले की, हो नोटीस पाठवल्याचे खरे आहे. आम्ही नुकताच चॅनलला नोटीस पाठवली आहे आणि शीजान खान हा शोमध्ये सहभागी होऊ शकत नाही.