Tunisha Sharma | शीजान खान याच्या बहिणीची पोस्ट पाहून तुनिशा शर्मा हिच्या काकाचा संताप, म्हणाले युद्ध जिंकून…
तुनिशा शर्मा प्रकरणात शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले गेले. काही महिने जेलमध्ये शीजान खान याला राहवे लागले. आता शीजान खान हा बाहेर आलाय. शीजान खान याचे कुटुंबिय त्याला घेण्यासाठी जेलबाहेर पोहचले होते.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे आत्महत्येच्या काही तास अगोदरच तिने सोशल मीडियावर (Social media) एक खास पोस्ट शेअर केली होती. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमधील मुख्य कलाकार शीजान खान (Sheezan Khan) याच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा शर्मा हिच्या आईने तर म्हटले की, माझ्या मुलीच्या आत्महत्येला शीजान खान हाच कारणीभूत आहे.
तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर शीजान खान याला तब्बल अडीच महिने जेलमध्ये राहवे लागले. तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. तुनिशा शर्मा हिने शीजान खान याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतला होता. तुनिशा हिने आत्महत्या करण्याच्या फक्त पंधरा दिवस अगोदरच शीजान खान आणि तुनिशाचे ब्रेकअप झाले होते. यामुळे तुनिशा तणावात असल्याचे सांगण्यात येत होते.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्यावर आयपीसी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. बरेच दिवस शीजान खान याला कोर्टाकडून दिला मिळत नव्हता. शेवटी 4 मार्च रोजी शीजान खान याला दिलासा मिळाला. शीजान खान हा जेलमधून बाहेर येताना त्याची आई ढसाढसा रडताना दिसली. बहिणीही भावूक झाल्या होत्या.
शीजान खान याची बहीण शफक नाज हिने नुकताच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. या पोस्टमध्ये तिने एक फोटोही शेअर केलाय. या फोटोमध्ये सर्व कुटुंब दिसत असून सर्वजण आनंदामध्ये बसलेले दिसत आहेत. मात्र, हा फोटो अनेकांना आवडला नाहीये. आता या फोटोवर तुनिशा शर्मा हिच्या काकाची देखील प्रतिक्रिया आलीये.
तुनिशा शर्मा हिच्या काकांनी नुकताच एक मुलाखती दिलीये. शफक नाज हिने शेअर केलेल्या फोटोवर तुनिशा शर्मा हिचे काका म्हणाले की, असा फोटो शेअर केलाय जसे की हा शीजान खान मोठे युद्ध जिंकून आलाय. कोर्टाने त्याला जेलमध्ये 70 दिवस ठेवले आहे, काहीतरी असल्याशिवाय शीजानला जेलमध्ये ठेवण्यात आले. शीजान खान याच्या बहिणीने शेअर केलेली ही पोस्ट अनेकांना अजिबात आवडली नाहीये.