Pearl Puri | अभिनेत्याला जामीन नाहीच! पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
'नागीन' फेम अभिनेता पर्ल पुरी (Pearl Puri) याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता कोर्टाने पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे आणि त्याला जामीनही नाकारण्यात आला आहे.
मुंबई : ‘नागीन’ फेम अभिनेता पर्ल पुरी (Pearl Puri) याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता कोर्टाने पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे आणि त्याला जामीनही नाकारण्यात आला आहे. आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर/डब्ल्यू पोक्सो कायदा, 4, 8, 12,19, 21 अन्वये पोलिसांनी 4 जूनच्या रात्री पर्लला अटक केली होती (TV actor Pearl V Puri sent to 14 day judicial custody in minor rape case).
पर्लची मैत्रीण अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने एक पोस्ट शेअर करत पर्लला जामीन मिळाल्याचे सांगितले होते. पर्लबरोबर फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘सत्यमेव जयते. सत्य जिंकले आणि पर्ल देखील जिंकला. बेल मिळाली आहे.’ मात्र, आता डीसीपी संजय पाटील यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, पर्लला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि त्याला जामीनही मिळालेला नाही.
पिडीत मुलगी 5-7 वर्षांची होती, म्हणून पर्लवर पॉस्को (लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण) अर्थात लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यामध्ये आरोपींना जामीन मिळूच शकत नाही. कारण, याला अजामीनपात्र गुन्हा म्हणतात. त्यामुळे पर्ल पुरीचा जामीन फेटाळण्यात आला असून, त्याला न्यायलयीन कोठडीत धाडण्यात आले आहे (TV actor Pearl V Puri sent to 14 day judicial custody in minor rape case).
मुलीच्या वडिलांनी दाखल केला गुन्हा
वृत्तानुसार, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि विनयभंग केल्याप्रकरणी पर्लला पोलिसांनी अटक केली होती. अहवालानुसार या मुलीचे वय 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान आहे आणि म्हणून पर्लला पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका पोर्टलनुसार मुलीच्या वडिलांनी दिलेल्या अनेक तक्रारींमध्ये असे लिहिले गेले आहे की, मुलीला पर्लबरोबर सेल्फी घ्यायची होती. त्यानंतर पर्ल तिला व्हॅनिटी व्हॅनमध्ये घेऊन गेला. आणि तिथे त्याने तिचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केला.
दोन वर्षांपूर्वी घडला गुन्हा
टीव्ही 9ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, हे प्रकरण 2019-20चा आहे, जिथे पर्ल मुंबईला लागून वसई नायगाव दरम्यान त्याच्या सीरियलसाठी शूट करत होता. ज्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पर्लवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्याची पत्नीदेखील या मालिकेचा एक भाग होती. ही मुलगी पर्लला त्याच्या ऑन-स्क्रीन नावाने ओळखत असे. ही तक्रार केवळ मुलीच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. याबाबत आईकडून कोणतेही विधान आलेले नाही.
(TV actor Pearl V Puri sent to 14 day judicial custody in minor rape case)
हेही वाचा :
Disha Patani : जेव्हा दिशा पाटनी रेडकूची पप्पी घेते, पाहा फोटो
Yami Gautam : यामी गौतमच्या हातावर आदित्य धरच्या प्रेमाची मेहेंदी, सोशल मीडियावर फोटो शेअर
‘Naagin 3’ फेम अभिनेता पर्ल पुरीला पोलिसांकडून अटक, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या…#PearlVPuri | #PearlPuri | #Naagin3 https://t.co/K3LUh7bvx9
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021