Rubina Dilaik | ‘त्या’ चर्चांवर पूर्णविराम देत रुबिना दिलैक हिने सांगितले सत्य
विशेष म्हणजे रुबिना बिग बाॅसची विजेती देखील आहे. शोमध्ये रुबिनाने अनेक धक्कादायक खुलासे देखील केले.
मुंबई : रुबिना दिलैक हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हीट टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून रुबिना सतत रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होत आहे. बिग बाॅस, खतरो के खिलाडी आणि झलक दिखला जा या शोमध्ये रुबिना दिसलीये. बिग बाॅसमध्ये तर रुबिना पती अभिनव शुक्लासोबत सहभागी झाली होती. विशेष म्हणजे रुबिना बिग बाॅसची विजेती देखील आहे. शोमध्ये रुबिनाने अनेक धक्कादायक खुलासे देखील केले. अभिनवसोबतच्या रिलेशनला शेवटीची संधी देण्यासाठी ती आणि अभिनव शोमध्ये सहभागी झाल्याचे तिने सांगितले होते.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत रुबिना आणि अभिनव चर्चेत आहेत. रुबिना प्रेग्नेंट असून ती आणि अभिनव लवकरच आई-वडील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. खरोखरच रुबिना प्रेग्नेंट आहे का? हा प्रश्न तिला सातत्याने सोशल मीडियावर विचारला जात होता.
यासर्व चर्चांवर आता रुबिनाने मोठे भाष्य केले आहे. रुबिना हिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी शक्यतो अशा गोष्टींकडे कधीच लक्ष देत नाही किंवा त्यावर उत्तर देखील देत नाही. परंतू मला हे ऐकून हसू येत आहे.
View this post on Instagram
चार दिवसांपूर्वी रुबिना आणि अभिनव मटर्निटी क्लिनिक बाहेर स्पाॅट झाले होते. तेंव्हापासूनच चर्चा होती की, रुबिना ही प्रेग्नेंट आहे. मात्र, रुबिना हिने स्वत: सांगितले की, ती प्रेग्नेंट नाहीये. या सर्व अफवा आहेत.
रुबिना तिच्या बिनधास्त वागण्यामुळे ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी रुबिना खतरो के खिलाडी या शोमध्ये सहभागी झाली होती. बिग बाॅसच्या घरात असताना अनेक गोष्टींवरून रुबिना हिने थेट सलमान खानसोबत देखील पंगा घेतला होता.