Uorfi Javed | वडिलांकडून शिवीगाळ, आई करायची मारहाण, उर्फी जावेद हिने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली…

उर्फी जावेद ही देखील टिका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळाली आहे. यापूर्वी उर्फी जावेद हिने अनेक टिव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या आहेत.

Uorfi Javed | वडिलांकडून शिवीगाळ, आई करायची मारहाण, उर्फी जावेद हिने केले धक्कादायक खुलासे, म्हणाली...
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 4:52 PM

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद (Uorfi Javed) ही कायमच चर्चेत असते. विशेष बाब म्हणजे उर्फी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत राहते. अनेकदा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे टार्गेट केले जाते. अनेकांनी आतापर्यंत उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून तिला खडेबोल सुनावले आहेत. मात्र, उर्फी जावेद ही देखील टिका करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेते. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळाली आहे. यापूर्वी उर्फी जावेद हिने अनेक टिव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका देखील केल्या आहेत. मात्र, सध्या उर्फी प्रचंड चर्चेत आहे.

बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यावर उर्फी जावेद हिच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झालीये. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. उर्फी जावेदने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतात.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उर्फी जावेद हिने मोठे खुलासे केले आहेत. इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने कशाप्रकारे संघर्ष केला हे अभिनेत्रीने सांगितले आहे. उर्फी जावेद हिला घरामधून मोठा विरोध करण्यात आला होता. इतकेच नाही तर तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला.

उर्फी जावेद हिला एकून पाच बहिण भाऊ असून ती दुसऱ्या नंबरची आहे. उर्फी जावेद हिचे संपूर्ण बालपण हे लखनऊमध्ये गेले. उर्फी जावेद हिला रोज घराच्यांचे बोलणे ऐकावे लागत असतं. उर्फी म्हणाली की, माझ्या आयुष्यात एक अशी वेळ आली होती की, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घरच्यांना कंटाळून घेतला होता.

पुढे उर्फी म्हणाली, मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. माझे वडील मला प्रत्येक गोष्टीत बंधने घालायचे. माझा सुरूवातीपासूनच फॅशनकडे अधिक कल होता. मी टीव्ही खूप जास्त बघायची. उर्फी म्हणाली की, मला माझे वडील कायमच शिवीगाळ करायचे. इतकेच नाही तर माझ्या आईने मला मारहाण देखील अनेकदा केलीये.

काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी उर्फी जावेद हिच्यावर टीका केली होती. कारण त्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने शर्ट घातले नव्हते. तिने फक्त हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेतली होती. हा व्हिडीओ तिचा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. उर्फीचा तो व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.