मुंबई : उर्फी जावेद ही कायमच तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत राहते. कायमच सोशल मीडियावर उर्फी जावेद (Uorfi Javed) आपले हटके फोटोशूट शेअर करते. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिचे फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा चाहता वर्ग अत्यंत मोठा आहे. उर्फी जावेद हिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्सचा पाऊस पडतो. काही दिवसांपूर्वी शर्ट न घातला फक्त नाश्त्याची प्लेट हातामध्ये घेत उर्फी जावेद हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. उर्फी जावेद हिचा तो व्हिडीओ (Video) बघितल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला. या व्हिडीओवरून काही जणांनी उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावले. बऱ्याचदा उर्फी जावेद ही अत्यंत बोल्ड फोटो शेअर करते. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरणे उर्फी जावेद हिला बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर या ब्रोकरला बिहारमधून अटकही करण्यात आली. बऱ्याच वेळा उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात.
अत्यंत कमी वेळामध्ये उर्फी जावेद हिने तिच्या अतरंगी कपड्यांमुळे एक वेगळी ओळख मिळवली आहे. बिग बाॅस ओटीटीमधून बाहेर पडल्यानंतर उर्फी जावेद हिच्या चाहत्यांमध्ये वाढ झालीये. उर्फी जावेद हिने आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची राहणारी असून अनेक वर्षांपूर्वी तिने मुंबई गाठली आहे. नुकताच उर्फी जावेद हिने तिच्या इंस्टा स्टोरीवर खास फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये उर्फी जावेद अत्यंत बोल्ड दिसत आहे. आता उर्फी जावेद हिचा हा फोटो व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फी जावेद हिने जो फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. त्यामध्ये ती हिरव्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत असून यामध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे. उर्फी जावेद हिने को-ऑर्डर सेट घातला आहे. ज्यामध्ये हिरवा टॉप आणि हिरवा स्कर्ट आहे. चाहत्यांना तिचा हा लूक आवडला आहे.
उर्फी जावेद हिच्या या आउटफिटमध्ये एक हटके गोष्ट असून हा सर्व आउटफिट दोरींनी बांधण्यात आलाय. आता उर्फी जावेद हिचा हा फोटो व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपला मोर्चा हा उर्फी जावेद हिच्याकडे वळवला होता. यावेळी उर्फी जावेद हिने चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले होते.