मुंबई : उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून तिच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत आहे. अनेकदा उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला तिच्या कपड्यांमुळे टार्गेट केले जाते. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. यावेळी उर्फी जावेद हिला जिथे भेटले तिथे हाताखालून काढण्याची भाषा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली. त्यानंतर हे प्रकरण इतके जास्त वाढले की, थेट महिला आयोगाकडे पोहचले. उर्फी जावेद हिने देखील यादरम्यान सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
उर्फी जावेद ही कायमच तिच्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी एका ब्रोकरने दिली होती. त्यानंतर या ब्रोकरच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी त्याला बिहारमधून अटक केली.
उर्फी जावेद हिचा आता होळीनंतर अतरंगी लूक पुढे आलाय. अनेकांना उर्फी जावेद हिचा नवा लूक पाहून मोठा धक्का बसलाय. सध्या उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी याने त्याच्या इंस्टावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी अतरंगी स्टाईलमध्ये दिसत आहे.
या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही विमानळावर दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने व्हाइट कलरचा क्रॉप टॉप आणि डेनिम लॉन्ग स्कर्ट घातलेला दिसत आहे. मात्र, उर्फी जावेद हिच्या या ड्रेसवर असंख्य छिद्र पडलेले दिसत आहेत. या ड्रेससोबत उर्फी जावेद हिने वेनी घातलेले दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
उर्फी जावेद हिच्या या अतरंगी स्टाईलनंतर सोशल मीडियावर उर्फी जावेद हिला ट्रोल केले जात आहे. एका युजर्सने लिहिले की, ही उर्फी जावेद कधी काय करेल हे सांगणे फार जास्त अवघड आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले की, हिला कोणीतरी थांबवा रे…तिसऱ्या युजर्सने लिहिले की, ही उर्फी काहीही स्टाईल करते. काही दिवसांपूर्वी उर्फी जावेद हिने शर्ट न घालता एक फोटोशूट केले होते, ज्यामध्ये तिच्या हातामध्ये फक्त नाश्त्याची प्लेट दिसत होती.