मुंबई : बिग बाॅस ओटीटी फेम उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. उर्फी तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांवरून टार्गेट केले जाते. मात्र, उर्फी तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या आहेत. मात्र, हे काहीही असले तरीही या गोष्टींचा उर्फीला अजिबात फरक पडत नाही. काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने तिला मेसेज करत रेप करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर उर्फीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी या व्यक्तीला अटकही केलीये.
उर्फी सोशल मीडियावर कायमच तिचे हटके आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. इतर कोणी ज्या गोष्टींचा विचारही करू शकत नाही ते उर्फी कायमच करते. बोल्ड कपड्यांमध्येच उर्फी स्पाॅट होते.
नुकताच उर्फी हिने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. आता हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये.
उर्फीने चक्क कपड्यांशिवाय हा व्हिडीओ तयार केला आहे. उर्फीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तिने वरती कोणतेच कपडे घातलेले नाहीत. खाली काळा स्कर्ट घातला आहे.
यावेळी उर्फीने नाश्त्याची एक प्लेट आणि दुसऱ्या हातामध्ये ज्यूसचा ग्लास घेतलेला दिसत आहे. उर्फीचा हाच व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. उर्फी या व्हिडीओमध्ये बोल्ड दिसत आहे.
उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून युजर्स या व्हिडीओला लाईक करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत तुझ्या डोक्यामध्ये अशा कल्पना कुठून येतात हा प्रश्न देखील विचारला आहे.